
Happy Sankashti Chaturthi 2024 HD Images: हिंदू कॅलेंडरनुसार, विकट संकष्टी चतुर्थीचे (Sankashti Chaturthi 2024) व्रत दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळतो. तसेच साधकाला जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. यासोबतच कुटुंबात सुख-समृद्धी राहते. नारदपुराणानुसार, मनाचा स्वामी चंद्र आणि बुद्धीचा स्वामी श्री गणेश यांच्या संयोगामुळे या चतुर्थीचे व्रत केल्यास मानसिक शांती, कामात यश आणि प्रतिष्ठा वाढते. या दिवशी केलेले व्रत आणि पूजा वर्षभर सुख, समृद्धी आणि कौटुंबिक विकासासाठी उपयुक्त ठरते.
गणेशभक्त मोठ्या भक्ती-भावाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. तसेच एकमेकांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देतात. विकट संकष्टी चतुर्थी निमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन तुम्ही गणेशभक्तांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -Vikata Sankashti Chaturthi 2024: विकट संकष्टी चतुर्थीच्या म्हणा 'गणेश कवच' होतील सर्व मनोकामना पूर्ण)






नारद पुराणानुसार, या दिवशी भगवान गजाननाची आराधना केल्याने सुख-सौभाग्य वाढते, घर-परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती होते आणि प्रलंबित शुभ कार्ये पूर्ण होतात. या चतुर्थीमध्ये चंद्राचे दर्शन घेतल्यास श्रीगणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर त्याने श्रीगणेशाची आराधना करावी, जेणेकरून तो योग्य निर्णय घेऊन जीवनात यशस्वी होऊ शकतो.