
यंदा मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी गुजराती नवीन वर्ष (Gujarati New Year 2023) साजरे होत आहे. हा दिवस संपूर्ण गुजरात राज्यात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील नवीन विक्रम संवत वर्ष चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेला सुरू होते, ज्या दिवशी गुडी पाडवा आणि उगादी सण साजरे होतात. मात्र गुजराती नववर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेला सुरू होते. तिथीनुसार 14 नोव्हेंबर दिवशी विक्रम संवत 2080 चा (Vikram Samvat 2080) पहिला दिवस असणार आहे.
विक्रम संवत ही सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेली दिनदर्शिका आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. गुजरातमध्ये नवीन वर्षाच्या आगमनाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. कारण गुजरातमध्ये दिवाळी हा सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस असतो. चंद्र चक्रावर आधारित भारतीय कॅलेंडरनुसार, कार्तिक महिना गुजरातमध्ये वर्षाचा पहिला महिना आहे. गुजराती नववर्षाचा पहिला दिवस आर्थिक नवीन वर्षाची सुरुवात म्हणूनही पाहिला जातो. या दिवशी बेस्टु वरस (Bestu Varas) म्हणत शुभेच्छा दिल्या जातात.
तर तुम्ही देखील या खास प्रसंगी Wishes, HD Images, Messages, Greetings शेअर करत द्या विक्रम संवत आणि गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा.






(हेही वाचा: Diwali Padwa 2023 Wishes: दिवाळी पाडव्यानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा द्या खास शुभेच्छा!)
दरम्यान, गुजरातच्या नवीन वर्ष विक्रम संवत 2080 मध्ये पेढी उघडण्याची शुभ वेळ मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.39 ते दुपारी 1.47 पर्यंत आहे. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवींच्या सान्निध्यात व्यापारी लोक आपल्या बही-खात्याची पूजा करतात. या दिवशी गुजराती लोक एकत्र येऊन नवने कपडे परिधान करुन मंदिरात पूजापठण करतात. तर दुसरीकडे गृहिणी घरात पंचपक्वानांचा बेत करतात.