दिवाळीच्या दिवसामध्ये गुजराती बांधव नववर्ष साजरं करतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी गुजराती बांधवांसाठी नव्या वर्षाची सुरूवात होते. यंदा दिवाळी पाडवा 26 ऑक्टोबर दिवशी असल्याने दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी गुजराती नववर्ष साजरं केलं जाणार आहे. तिथीनुसार 26 ऑक्टोबर दिवशी विक्रम संवत 2079 चा पहिला दिवस असणार आहे. या दिवशी बेस्टु वारस (Bestu Varas) किंवा साल मुबारक (Saal Mubarak)म्हणतही शुभेच्छा दिल्या जातात. मग तुमच्या मित्रमंडळींना, आप्तांना, नातेवाईकांना या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स, व्हॉट्सअॅप मेसेजेस, स्टेटस, Wishes द्वारा शुभेच्छा देण्यासाठी खास HD Images शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
यंदाच्या वर्षी कोरोना संकट दूर सारून पहिल्यांदाच मागील 2 वर्षात पुन्हा आनंदाचं, चैतन्याचं वातावरण आहे. निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी होत असल्याने अनेक जण बाहेर पडून मित्र मंडळींना भेटून शुभेच्छा देत आहेत.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीच्या दिवसांमध्ये बेस्टु वारस हा सण गुजराती लोकांसाठी फार विशेष असतो. या दिवशी घरात शुभकार्य केली जाते, आतषबाजी केली जाते. घराघरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते.