Bestu Varas 2020 Wishes: भारतात सर्वत्र दिवाळीची (Diwali 2020) धामधूम पाहायला मिळत आहे. आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. पाच दिवसीय दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज (Bhaubeej) सण साजरा केला जातो. याच दरम्यान गुजराती बांधवांसाठी नववर्षाचा (Gujarati New Year) देखील उत्सव असतो. साधारणपणे हा सण दिवाळीच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो. मात्र यंदा तिथीनुसार आज (16 नोव्हेंबर) विक्रम संवत 2077 (Vikrant Samvat 2077) सुरुवात होत आहे. याला बेस्टु वारस (Bestu Varas) किंवा साल मुबारक (Saal Mubarak) असेही म्हटले जाते. म्हणूनच आजच गुजराती बांधवांचे नवीन वर्ष देखील सुरु होत आहे. या दिवशी गुजराती लोक एकत्र येऊन नवने कपडे परिधान करुन मंदिरात पूजापठण करतात. तर दुसरीकडे गृहिणी घरात पंचपक्वानांचा बेत करतात.
मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करायचे असल्याने अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा केला जाईल. अशा वेळी अशा पवित्र सणाच्या आपल्या आप्तेष्ठांना तसेच मित्रपरिवाला नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गुजराती आणि इंग्रजीमधून शुभेच्छा संदेश
बेस्टु वारस हा सण गुजराती बांधवांसाठी फार विशेष मानला जातो. या दिवशी हे लोक अनेक शुभकार्य करतात. या दिवशी आतिषबाजी, घराघरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे या सणा दिवशी कोरोनामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून हे शुभेच्छा संदेश कामी येऊ शकतात.