
Vasant Panchami 2020 Marathi Wishes: वसंत पर्वाच्या प्रारंभी वसंतपंचमी (Vasnat Panchami 2020) या खास तिथीवर विद्येची देवता महासरस्वती (Mahasaraswati) हिचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या मुहूर्तावर सरस्वती पूजन (Saraswati Pujan) करून बुद्धीचे वरदान मागितले जाते, ब्राह्मण ग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अशा या देवीकडे मनोभावे पूजन करून वर मागितल्यावर ती भक्तांची मनोकामना नक्की पूर्ण करते असे मानले जाते. यंदाच्या कालदर्शिकेनुसार, वसंत पंचमीचा उत्सव 29 तसेच 30 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. यापैकी आज 29 जानेवारी रोजी सरस्वती पूजनाचा मुहूर्त आहे. या खास सणाच्या निमित्ताने आपल्या नातेवाईक, प्रिय व्यक्तींना शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांचा दिवशी खास करू शकाल. अलीकडे डिजिटल जगात मॅसेज करून शुभेच्छा देणे सोप्पे झाले असले तरी मोजक्या शब्दात शुभेच्छा देणारे मॅसेज शोधणं मात्र कठीण होऊन बसलं आहे. तुमचा हा त्रास वाचवण्यासाठी आम्ही हि काही फ्री टू डाउनलोड शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. या मराठी Messages, HD Images, Greetings, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रियजनना आवर्जून शुभेच्छा देऊ शकाल.
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Vasant Panchami 2020: जाणून घ्या का साजरी केली जाते वसंत पंचमी; उत्सवाचे महत्व, पूजाविधी आणि मुहूर्त
ज्ञानदेवी सरस्वतीच्या पूजन दिनी खुप खूप शुभेच्छा

सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

सरस्वती देवीच्या जन्मदिनी भक्तिमय शुभेच्छा

वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या
तुम्हास व तुमच्या परिवारास खूप शुभेच्छा

प्राचीन काळापासून वसंत ॠतूच्या आगमनासाठी सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती आजही काही ठिकाणी ही प्रथा आवर्जून पाळली जाते. आजच्या या शुभ दिवशी तुम्हा सर्वांना सरस्वती जन्म व वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !