Vasant Panchami 2019: वसंत पंचमी दिवशी कुंभ मेळ्याचे तीसरे आणि शेवटचे शाही स्नान (फोटो सौजन्य-PTI)

Vasant Panchami 2019: कुंभ (Kumbh) येथे आज रविवारी (10 फेब्रुवारी) वसंत पंचमीचे औचित्य साधून तिसरे शाही स्नान पार पडणार आहे. या शाही स्नानावेळी कमीतकमी 2 करोड लोकांपेक्षा अधिक भक्तजन उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. या पूर्वी दोन शाही स्नान झाले होते. एक मकरसंक्रातच्या दिवशी तर दुसरे मौनी अमावस्येच्या दिवशी.

वसंत पंचमी (Vasant Panchami) कुंभ मेळ्यातील तिसरे आणि शेवटचे शाही स्नान आहे. पंचनी तिथी 2 वाजून 9 मिनिटांपर्यंत हे शाही स्नान सुरु राहणार आहे. तर सर्वात महत्वाचे स्नान म्हणून याला संबोधले जाते. असे मानले जाते की, या दिवशी तीन वेळा डुबकी मारल्याने भक्तांना गंगा, यमुना आणि सरस्वतीचा आशिवार्द मिळतो. त्यामुळेच भाविकांमध्ये वसंत पंचमीच्या शाही स्नानाला फार महत्व आहे. तसेच आखाडा परिषदचे अध्यक्ष नरेंद्न गिरी यांनी असे सांगितले की, कुंभ मेळ्यात तीन शाही स्नान आणि तीन पर्व स्नान असतात. (हेही वाचा-Vasant Panchami 2019: 'या' कारणांसाठी साजरी केली जाते वसंत पंचमी!)

राज्यातील पोलीस महानिर्देशक ओ.पी. सिंह यांनी पीटीआय (PTI) ला असे सांगितले की, संपूर्ण कुंभ क्षेत्रात 20,000 पोलीस आणि 6,000 होमगार्ड भविकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्याचसोबत 40 पोलीस ठाणे, 28 पोलीस चौकी बनवण्यात आले आहेत.