
Valentine’s Day 2022 Wishes: फेब्रुवारीचा महिना हा कपल्ससाठी अत्यंत खास असल्याचे मानले जाते. कारण या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत व्हेलेंटाइन वीक साजरा केला जातो. तर 14 फेब्रुवारीला कपल्ससह एखाद्याला आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी सर्वात मोठा असलेला दिवस म्हणजे व्हेलेंटाइन डे हा एकदम परफेक्ट डे असल्याचे मानले जाते. व्हेलेंटाइन वीक दरम्यान रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे साजरा केला जातो. अखेरच्या दिवशी व्हेलेंटाइन डे सेलिब्रेट करण्यात येतो. प्रत्येक दिवशी आपल्या पार्टनरला स्पेशल फील करुन देण्यासाठी विविध गिफ्ट्स देत एकमेकांना खुश केले जाते. तसेच रोमँन्टिक मेसेज पाठवून पार्टनरचे मन जिंकण्याचा प्रयत्न ही केला जातो.
यंदाच्या 'व्हेलेंटाईन डे’ निमित्त Wishes, Images, Whatsapp Status, Facebook Post, Greetings देत पार्टनरकडे आपल्या मनातील भावनांची द्या कबुली. (Slap Day: 'व्हॅलेनटाईन डे' नंतर Anti-Valentine Day ला सुरुवात, का साजरा करतात स्लॅप डे?)





सम्राट क्लाऊडियसला निषेध करत संत व्हेलेंटाईन यांनी जोडप्यांचं लग्न लावलं. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो.