तुलशी विवाह (Photo Credits: Facebook)

Tulsi Vivah 2019: हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला (Tulsi Vivah) सुरुवात होते. यंदा 9 नोव्हेंबरला म्हणजे येत्या शनिवारी तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. तुळशीचे लग्न लहानांपासून मोठ्यापर्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुळशीचा विवाह पार पडल्यानंतर हिंदू धर्मात लग्नासाठी तारखा काढण्याची पद्धत आहे. तुळशीचे लग्न हा अनेक कुटुंबामध्ये धुमधडाक्यात साजरा करण्याचा कार्यक्रम आहे. काही कुटुंबात अगदी खऱ्याखुऱ्या पद्धतीप्रमाणे तुळशी विवाह पार पाडला जातो. तुळसी विवाह केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: यंदा तुळशी विवाह 'कधी' आहे आणि 'का' साजरा करतात? जाणून घ्या काय आहे यामागची अख्यायिका)

पौराणिक आख्यायिकेनुसार, या दिवशी भगवान विष्णूचा विवाह तुळशी मातेशी लावला जातो. ही पुजा केल्यान धनलाभ होतो, असे मानले जाते. परंतु, त्यासाठी तुळसी पूजन करताना काही गोष्टी करणे आवश्यक आहे. तुम्हालाही असा धनलाभ हवा असेल, तर खालील गोष्टी करून तुम्ही भरपूर श्रीमंत होऊ शकता. चला तर मग धनलाभ होण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहेत, ते जाणून घेऊयात...

हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी विवाहाचा मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह?

'या' गोष्टी करून तुम्ही मिळवू शकता भरपूर धनलाभ -

  • तुळशी पूजनावेळी विष्णूची पुजा करताना आपल्या जवळील काही पैसे विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवा. पुजा झाल्यानंतर ते पैसे आपल्या पॉकेटमध्ये ठेवा. त्यामुळे तुम्हाला भरपूर धनलाभ होण्याची शक्यता असते. तसेच असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमी पडणार नाही.
  • दुधामध्ये केसर मिसळून विष्णूला अभिषेक करा. त्यामुळे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
  • तुम्हाला एखाद्या कार्यात वारंवार अडथळा येत असेल, तर विष्णू मंदिरात जावून एक नारळ आणि थोडे बदाम अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमचे सर्व कामे सुरळीत होतील.
  • एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान केल्यास तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदेल. तसेच स्नान झाल्यानंतर गायत्री मंत्राचा जप केल्यास तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
  • प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूची पुजा करा. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तसेच तुमच्या संसारात सुख, समृद्धी लाभेल.

तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. ज्यांचा विवाह झाला आहे, अशा लोकांनी तुळशी विवाह करणं गरजेचं असतं. तुळशी विवाह केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. तसेच धनलाभही होतो. विवाहित जोडप्याने तुळशी विवाह करणं खूप गरजेचं आहे. तुळशी विवाह केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)