Tanaji Malusare Punyatithi | File Photo

Tanaji Malusare Punyatithi 2021: 'गड आला पण सिंह गेला' हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हळहळत्या अंत:करणाने काढलेले उद्गार केवळ तानाजी मालुसरे यांच्यासाठी होते. या शिवरायांच्या प्रभावी वक्तव्याला साजेसं असं त्यांचे कतृत्व होतं. उद्या माघ कृष्ण नवमी म्हणजेच तानाजी मालुसरे यांची तिथीनुसार पुण्यतिथी. तानाजींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी खास HD Images, Wallpapers. सोशल मीडियाच्या फेसबुक(Facebook) , व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) या माध्यमातून शेअर करुन तुम्ही त्यांच्या स्मृतीला अभिवादन करु शकता. (Tanaji Malusare Death Anniversary: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी काही खास गोष्टी!)

शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक असणारे तानाजी मालुसरे त्यांचे बालपणीचे मित्र आणि विश्वासू साथीदार होते. कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी त्यांनी दाखवलेले शौर्य इतिहासातील एक सोनेरी पान बनले आहे. स्वत:च्या मुलाचे लग्नकार्य बाजूला ठेऊन स्वराज्याप्रती असलेले कर्तव्य जपणारे तानाजी. त्यांच्या कार्यातून निष्ठेची साक्ष देतात.

तानाजी मालुसरे पुण्यतिथी निमित्त अभिवादन:

Tanaji Malusare Punyatithi | File Photo
Tanaji Malusare Punyatithi | File Photo
Tanaji Malusare Punyatithi | File Photo
Tanaji Malusare Punyatithi | File Photo
Tanaji Malusare Punyatithi | File Photo

तानाजी मालुसरे यांच्या शौर्याला सलाम म्हणून कोंढाणा गडाचे सिंहगड असे नामकरण शिवाजी महाराजांनी केले. तेथे त्यांचा पुतळा आणि स्मारकही उभारण्यात आलं आहे. दरम्यान, तानाजींचा धडाडी, शौर्य, निष्ठा यामुळे त्यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारण्याचा मोह कलाकारांनाही आवरला नाही आणि 'तानाजी' या सिनेमातून त्यांची जीवनकथा प्रेक्षकांसमोर सादर झाली.