Tanaji Malusare Death Anniversary 2022: मराठा साम्राज्यातील वीर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांनी आज पुण्यतिथी आहे. त्यांचे निधन 4 फेब्रुवारी 1670 रोजी झाले. तानाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र होते. तानाजी मालुसरे यांनी 1670 रोजी झालेल्या सिंहगडच्या लढाईत महत्वपूर्ण भुमिका बजावली होती. शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन तानाजी यांनी मुघलांच्या विरोधात सिंहगड येथे लढाई केली आणि तो किल्ला आपल्या ताब्यात मिळवला. मात्र तानाजी मालुरसे यांना या लढाईत आपले बलिदान द्यावे लागले. सिंहगडाला राजकिय रुपात महत्वपूर्ण मानले जात होते. या किल्ल्यावर मुघलांना आपले अधिराज्य गाजवायचे होते. तानाजी यांचा जन्म 1626 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोडोली येथे झाला होता.
तानाजी मालुसरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कोरले गेले हे. सिंहगड किल्ल्या मिळवण्यासाठी केलेली लढाई आणि त्याच्या विजयासाठी प्राण देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तर तानाजी मालुसरे यांना HD Images, Quotes, WhatsApp Stickers, Messages च्या माध्यमातून शूरवीराला करा सलाम!
तानाजी मालुसरे यांच्या शौर्याला सलाम म्हणून कोंढाणा गडाचे सिंहगड असे नामकरण शिवाजी महाराजांनी केले. तेथे त्यांचा पुतळा आणि स्मारकही उभारण्यात आलं आहे. दरम्यान, तानाजींचा धडाडी, शौर्य, निष्ठा यामुळे त्यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारण्याचा मोह कलाकारांनाही आवरला नाही आणि 'तानाजी' या सिनेमातून त्यांची जीवनकथा प्रेक्षकांसमोर सादर झाली.