Makar Sankranti 2020: नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ज्याकडे पाहिले जाते तो सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). या सणाच्या आदल्या संपूर्ण महाराष्ट्रात भोगी (Bhogi) साजरी केली जाते. 'न नाही भोगी, तो सदा रोगी' हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाक-या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात. माणसाच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह निर्माण व्हावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. या सणाच्या दिवशीही महिला पहाटे लवकर उठून केसावर आंघोळ करतात आणि दारात सुंदर रांगोळी काढतात.
तसं दारात रांगोळी काढणे हे मंगलदायी मानले जाते. त्यामुळे कित्येक महिला रोज सकाळी दारात छोटीशी का होईना पण रांगोळी काढतात. ज्या महिलांना ते शक्य नसेल तर त्या सणांना आपल्या दारात सुरेख रांगोळी काढतात.
चला तर मग पाहूया भोगी निमित्त विशेष रांगोळ्या:
हेदेखील वाचा- Bhogi Bhaji Recipes: भोगी च्या भाजीपासून त्याच्या कालवणापर्यंत अशा बनवा या लज्जतदार रेसिपीज, नक्की करुन करा
भोगी विशेष रांगोळी:
भोगी विशेष मोराची रांगोळी:
रांगोळी काढणे किंवा ते पाहून देखील मन प्रसन्न होते. मात्र त्या दिवसाची त्या सणाची विशेष आठवण ठेवायची असेल तर वर दिलेल्या रांगोळ्या नक्की तुमच्या दारात काढा.