Somvati Amavasya 2021: यंदा सोमवती अमावस्या कधी? जाणून घ्या त्यामागील महत्व आणि शुभ मुहूर्त
Photo Credit: Pixabay

Somvati Amavasya 2021:  हिंदू धर्मात सोमवती अमावस्येचे विशेष महत्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात अमावस्या येते. मात्र जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या संबोधले जाते. या दिवशी चंद्राचे दर्शन होत नाही. यंदा चैत्र महिन्यात सोमवती अमावस्या 12 एप्रिलला आली आहे. 2021 मध्ये य सोमवारी येणारी ही एकमेव अमावस्या आहे.(Amarnathji Yatra 2021: अमरनाथजी यात्रेसाठी नोंदणी 1 एप्रिलपासून सुरू; 28 जून ते 22 ऑगस्ट चालणार यात्रा)

सोमवती अमावस्या सोमवारी आल्याने भगवान शंकर यांची पूजा केल्याने कुंडलीतील कमजोर चंद्राला शक्ती मिळू शकते. या दिवशी दिलेल्या दानाला फार महत्व असते. धार्मिक शास्रानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी करण्यात आलेल्या दानामुळे घरात सुख-समृद्धी नांदते असे म्हटले जाते. तर सोमवती अमावस्येचा तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.(Amalaki Ekadashi 2021 Images: आमलकी एकादशी निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून भगवान विष्णूच्या भक्तांना द्या खास मराठी शुभेच्छा!)

>>अमावस्या सुरुवात- 11 एप्रिल 2021 सकाळी 06.03 वाजता

>>अमावस्या समाप्ती- 12 एप्रिल 2021 सकाळी 08.00 वाजेपर्यंत

पौराणिक कथेनुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी, तलाव किंवा कुंडात स्नान केल्यानंतर सूर्य देवाला अर्घ्य दिल्यास त्याचे विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान शंकराची केलेली पूजा फार फलदायी मानली जाते. सोमवती अमावस्येचा दिवशी देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करणे शुभ आहे. तर विवाहित महिला पिंपळाच्या झाडाची या अमावस्येला पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात.