Amalaki Ekadashi 2021 Images: आमलकी एकादशी निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून भगवान विष्णूच्या भक्तांना द्या खास मराठी शुभेच्छा!
Amalaki Ekadashi 2021 Images (PC - File Image)

Amalaki Ekadashi 2021 Wishes: फाल्गुन शुक्ल पक्षाच्या एकादशीला आमलकी एकादशीचे (Amalaki Ekadashi) व्रत ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णूसमवेत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे ही एकादशी आमलकी एकादशी म्हणून ओळखली जाते. याशिवाय ही एकादशी रंगभर्नी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. ही एकादशी सर्वात शुभ मानली जाते. यंदा ही एकादशी 25 मार्च म्हणजेच गुरुवारी पडत आहे.

पौराणिक कथांनुसार, आवळा वृक्ष भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. हिरवी फळे येणाऱ्या या झाडाच्या प्रत्येक भागात देवाचा निवास आहे. आवळ्याच्या मुळाशी श्री विष्णू यांचा तर खोडात भगवान शिव आणि वरच्या भागात ब्रह्मा यांचा निवास असतो, असं मानलं जातं. तसेच, त्याच्या फांद्यांमध्ये मुनि, देवता, पानांमध्ये वसु, फुलांमध्ये मरुद्गण आणि फळांमधील सर्व प्रजापती यांचा निवास असतो. आमलकी एकादशी निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील फोटोंचा वापर करू शकता.

Amalaki Ekadashi 2021 Images (PC - File Image)
Amalaki Ekadashi 2021 Images (PC - File Image)
Amalaki Ekadashi 2021 Images (PC - File Image)
Amalaki Ekadashi 2021 Images (PC - File Image)
Amalaki Ekadashi 2021 Images (PC - File Image)

दरम्यान, आमलकी एकादशी व्रत 25 मार्च रोजी साजरे केले जाईल. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आमलकी एकादशी म्हणून ओळखली जाते. धार्मिकदृष्ट्या या एकादशीला खूप महत्त्व आहे. शास्त्रात या एकादशीला आमला एकादशी किंवा रंगभरी एकादशी असंही म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेबरोबर आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते.