Shravan Maas Sankashti Chaturthi: आज श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या व्रताची सांगता करण्यासाठी चंद्रोदयाच्या वेळा!
Sankashti Chaturthi 2021 ( Image Credit- Facebook)

Sankashti Chaturthi Chandroday Timings Today: आज श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) दिवस आहे. हिंदू धर्मीयांच्या पवित्र महिन्यातील ही संकष्टी असल्याने गणेशभक्तांमध्ये आज विशेष उत्साह, आनंद आहे. दरम्यान प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. त्यापैकी वद्य पक्षातील चतुर्थी 'संकष्टी' तर शुक्ल पक्षातील चतुर्थी 'विनायकी' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. गणपती बाप्पाचे भक्त आजच्या दिवशी संकष्टीचं व्रत म्हणून उपवास करतात. सार्‍या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि संकटं दूर व्हावी या कामनेतून संकष्टी चतुर्थीचं व्रत केले जाते. सायंकाळी चंद्रोदयानंतर या व्रताची सांगता करण्याची प्रथा आहे. मग आज तुम्ही देखील बाप्पाकडे हे व्रत करणार असाल तर पहा तुमच्या शहरातील आजची चंद्रोदयाची वेळ काय आहे? (नक्की वाचा: Sankashti Chaturthi 2021 HD Image: संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास Wishes, WhatsApp Status, Facebook Image पाठवा आणि शुभेच्छा दया).

तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ?

मुंबई - 21.06

पुणे- 21.02

नाशिक- 21.02

नागपूर- 20.40

रत्नागिरी- 21.05

बेळगाव- 21.00

गोवा- 21.02

संकष्टीच्या दिवशी गणपतीची विशेष रुपाने पूजा केल्यास नकारात्मक प्रभाव दूर होतात. गणपती घरातील सर्व समस्या दूर करतो असे ही म्हणतात. त्यामुळे जो व्यक्ती आजच्या दिवशी व्रत ठेवतो आणि पूर्ण आस्थेसह पूजा करतो त्याचा गणपती प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर हे व्रत सूर्योदयापासून सुरु होते आणि चंद्र दर्शनानंतर पूर्ण होते.

राज्यात अजूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळं खुली न केल्याने आजही अनेकांना बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेता येणार नाही पण घरातल्या घरी देखील गणपती स्त्रोत्र म्हणून, बाप्पाची पूजा अर्चना करून त्याच्या आवडीचा नैवेद्य मोदक बनवून सहज केला जाऊ शकतो.

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. त्याची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)