Shivrajyabhishek Sohala 2020: महाराष्ट्राची असा एक धुरंधर, पराक्रमी योद्धा ज्याचे केवळ नावाने प्रत्येक मराठ्याची छाती अभिमानाने भरून येते अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज शिवराज्याभिषेक सोहळा आज संपन्न झाला होता. हा राज्याभिषेक सोहळा खूप भव्य आणि ऐतिहासिक होता. 6 जून 1674 ला भव्यदिव्य असा हा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला होता. म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार साजरा करण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार 1674 रोजी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेकाचा सोहळा पार पडल्यानंतर ते छत्रपती झाले.(Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सुवर्ण मुहूर्ताचा इतिहास)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानिमित्त महाराष्ट्रात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु यंदा कोरोना व्हायरसचा संकटामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मराठमोळी WhatsApp Stickers, Quotes, Messages, HD Wallpapers आणि Greetings च्या माध्यमातून शिवभक्तांना द्या शुभेच्छा!(छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त जाणून त्यांच्या 'अष्टप्रधान मंडळा'विषयी खास गोष्टी!)
तर गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला होता. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन मुख्य विधी पार पडले. या सोहळ्यात 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. त्यांना सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मंत्रांचे उच्चारण केले आणि प्रजेने महाराजाना आशीर्वाद दिला.यंदाचा राज्याभिषेकाचा सोहळा शिवभक्तांनी घरात राहून शिवरायांना मनातून मुजरा करत साजरा करावा असे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत केले होते.