Shivrajyabhishek Din 2020: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त जाणून त्यांच्या 'अष्टप्रधान मंडळा'विषयी खास गोष्टी!

राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांनी 'छत्रपती' हे पद धारण केले. शिवराय हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेचं होते. शिवरायांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली होती. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या समोर हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते.

Shivrajyabhishek Din 2020: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त जाणून त्यांच्या 'अष्टप्रधान मंडळा'विषयी खास गोष्टी!
शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ (PC - You Tube)

Shivrajyabhishek Din 2020: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1674 ला रायगडावर सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj's) शिवराज्याभिषेक सोहळा (Coronation Ceremony) पार पडला आणि हिंदवी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तमाम मराठी समाजासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना होती. राज्याभिषेकामुळे शिवरायांच्या कर्तृत्वाला राजमान्यता प्राप्त झाली.

शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक आणि प्रभावी होती. राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांनी 'छत्रपती' हे पद धारण केले. शिवराय हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेचं होते. शिवरायांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली होती. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या समोर हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. आज या लेखातून शिवरायांच्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊयात. (हेही वाचा - Shivrajyabhishek Din 2020 Messages: शिवराज्याभिषेक दिन निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Wishes, HD Images, Quotes च्या माध्यमातून शेअर करून शिवरायांना करा मानाचा मुजरा!)

पंतप्रधान (पेशवा) -

मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 15 हजार होन, पगार दिला जात होता.

पंत अमात्य (मजुमदार) - 

रामचंद्र नीलकंठ हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की, नाही हे पाहण्याचे त्याचे काम त्याच्याकडे होते. मजुमदाराला हा सर्व जमाखर्च तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12 हजार होन पगार होता.

पंत सचिव (सुरनीस) -

अण्णाजीपंत दत्तो हे सचिव होते. पत्रव्यवहारावर लक्ष ठेवण्याचं काम अण्णाजीपंत यांच्याकडे होतं. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जातं. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडे असे. पंत सचिव यांना जमीन महसुलाच्या व्यवहारावरदेखील लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक 10 हजार होन पगार होता.

मंत्री (वाकनीस) -

शिवरायांच्या अष्टप्रधान मंत्रीमंडळात दत्ताजीपंत त्रिंबक हे वाकनीसाचे काम पाहात असे. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत होती. त्यांना वार्षिक 10 हजार होन पगार मिळत होता.

सेनापती (सरनौबत) -

हंबीरराव मोहिते हे सेनापतीचे काम पाहात असतं. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता. मात्र, त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. सेनापतीला वार्षिक 10 हजार होन पगार मिळत असे.

पंत सुमंत (डबीर) -

रामचंद्र त्रिंबक हे शिवरायांच्या मंत्रीमंडळात डबीर होते. ते स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक 10 हजार होन पगार होता.

न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) -

निराजीपंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10 हजार होन पगार मिळत असे.

पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) -

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मोरेश्वर पंडित हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही त्यांची कामे असतं. त्यांना वार्षिक 10 हजार होन पगार मिळत असे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2020 07:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).