
Shivrajyabhishek Din 2022 Messages in Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार, 1596 मध्ये, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या 13 व्या दिवशी (त्रयोदशी) झाला. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, शिवाजीचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. गागा भट्ट यांच्या हस्ते शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर शिवाजी महाराजांना छत्रपती ची उपाधी मिळाली. शिवाजी महाराजांना प्रशासनात मदत व सल्ला देणारी आठ मंत्र्यांची परिषद अष्टप्रधान मंडळ होते. या परिषदेचा प्रत्येक मंत्री त्याच्या विभागाचा प्रमुख होता. परिषदेचे सर्व सदस्य नेमण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना होता. हे मंत्री शिवाजी महाराजांच्या उच्च सचिवांसारखे होते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी Images, Wishes, Greeting पाठवून शिवप्रेमींचा आजचा दिवस करा खास! यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (हेही वाचाा - Shivrajyabhishek Din 2022 HD Images: शिवराज्याभिषेक दिन साजरा करा WhatsApp Stickers, Quotes, Messages, Wallpapers आणि Greetings च्या माध्यमातून डिजिटल रुपात)
अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!

सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
रायगडाचे माथे फुलांनी सजले... पाहुन सोहळा
'छत्रपती' पदाचा 33 कोटी देवही लाजले...
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
