Shivrajyabhishek | (Photo Credits: Twitter)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Din 2021) सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वेळी शिवराज्याभीषेक (Shivrajyabhishek) सोहळ्याला 350 वर्षांनी तो 'सूवर्ण योग' येणार आहे. शिवरायांच्या राज्य कारभाराची ओळख असलेल्या 'सुवर्ण होना' वापरुन शिराज्याभिषेक केला जाणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वारा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे आज (6 जून) साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक यांदा शिवकालीन वस्तुंचा एक घटक असलेल्या 'होन' या दुर्मिळ नाण्यांनी होणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमत्त 'होन' सुपूर्थ होणे ही एक आनंदाचा क्षण असल्याची भावना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरु आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा केला जाणार आहे. परंपरेप्रमाणे होणारे सर्व कार्यक्रम रायगडावर पार पडणार आहेत. मात्र, लोकांची उपस्थिती मात्र मोजकी असेल. गेल्या वर्षीही कोरोना व्हायरस महामारीमुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थिती शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आहोत. (हेही वाचा, Shivrajyabhishek Din 2021: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, HD Images, Wallpapers, Greetings शेअर करुन शिवमय करा आजचा दिवस!)

खा. संभाजीराजे छत्रपती ट्विट

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तिशाली मुगल सामराज्याला टक्कर देत स्वराज्य स्थापन केले. त्या काळात औरंगजेब हा जगातील एका शक्तिमान राजांपैकी होती. अशा शक्तीला तोडीस तोड टक्कर देत शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे ते राजे झाले होते. परंतू, त्यांच्या राज्याभिषेक झाला नव्हता. जो पर्यंत राज्याभिषेक होत नाही तोवर राजा मानण्याची तेव्हा पद्धत नव्हती. अखेर त्यांनी राज्याभिषेक केला आणि ते हिंदीव स्वराज्याचे राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं स्वराज्य स्थापन केले.