Shivrajyabhishek Din 2020 Wishes: आज 4 जून, महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्या शिवरायांचा तिथीनुसार राज्याभिषेक (Shivrajyabhishek) झाल्याचा दिवस. ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) स्वतःला राज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घट आहे. म्हणून आजही हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केल्या जातो.
शिवजयंतीप्रमाणेच शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Din) सोहळ्याबद्दल दोन गटांमध्ये मतभेद आहेत. यातील एक गट 6 जून दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. तर काहींच्या मते तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी साजरा जातो. यंदा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेक सोहळा गुरूवारी म्हणजेचं 4 जून रोजी आहे.
शिवराज्याभिषेकाच्या दिवशी अनेक शिवभक्त रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेतात. या दिवशी शिवप्रेमी एकमेकांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे तुम्ही देखील शिवराज्याभिषेक दिन निमित्त साधून मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images, Facebook च्या माध्यमातून शेअर करून शिवरायांच्या कार्याला करा सलाम! (हेही वाचा - Shivrajyabhishek Din 2020 Messages: शिवराज्याभिषेक दिन निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Wishes, HD Images, Quotes च्या माध्यमातून शेअर करून शिवरायांना करा मानाचा मुजरा!)
शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगधोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आलं होतं. या दिवशी लाखो लोक रायगडावर जमले होते. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यात 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. राजमात जिजाऊ आणि जनतेच्या आशीर्वादाने शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.