Ram Navami Celebration in Shirdi: शिर्डीमध्ये 12 ते 14 एप्रिल दरम्यान रंगणार श्रीरामनवमी उत्‍सव; पहा कसा असेल संपूर्ण कार्यक्रम
शिर्डी साईबाबा मंदिर ( Photo Credit: Wikimedia Commons )

Shri Ram Navami Festival 2019 Programme: महाराष्ट्रामध्ये राम जन्म उत्सव शिर्डीच्या साई मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 12 ते 14 एप्रिल दरम्यान शिर्डीमध्ये (Shirdi) रामजन्मोत्सव दरम्यान खास उत्सव साजरा केला जाणार आहे. श्रीरामनवमी उत्‍सवाची (Ram Navami Utsav) सुरुवात 1911 मध्‍ये साईबाबांच्या (Sai Baba) अनुमतीने करण्‍यात आली. तेव्हापासून दरवर्षी साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये हा सण साजरा करतात. Ram Navami 2019: यंदा 13 एप्रिलला साजरी होणार राम नवमी; पहा नक्षत्र, तिथीची शुभ वेळ काय?

12 एप्रिल 2019

 • पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती,
 • पहाटे ५.०० वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक,
 • ५.१५ वा. व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ५.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन,
 • दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, कार्यक्रम
 • दुपारी ४.०० वा. ते सायं.६.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर कीर्तन होणार आहे.
 • सायंकाळी ६.३० वा.धुपारती होणार आहे.
 • सायं.७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत गीतरामायण हा कार्यक्रम रात्रौ ९.१५ वा. चावडीत श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक मिरवणूक परत आल्‍यानंतर रात्रौ १०.३० वा. शेजारती होईल.12 एप्रिलला पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.

13 एप्रिल 2019

 • पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती,
 • पहाटे ५.०० वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल.
 • पहाटे ५.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्‍नान होईल. सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर श्रीरामजन्‍म किर्तन कार्यक्रम,
 • दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती होणार आहे.
 • दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक
 • सायं.५.०० वा. श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं.६.३० वा. धुपारती होईल.
 • सायं.७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत श्री.सुदेश भोसले, मुंबई यांचा भावगीत/भक्‍ती संगीत हा कार्यक्रम होणार आहे.
 • रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल.13 एप्रिल हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. 13एप्रिल रोजीची नित्‍याची शेजारती व 14 एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.

14 एप्रिल 2019

 • पहाटे ५.०५ वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन,
 • सकाळी ६.३० वा. गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक,
 • सकाळी १०.३० वा. गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम . दुपारी १२.१० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद,
 • सायं.६.३० वा. धुपारती होणार असून सायं.७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत कैलास हरेकृष्‍णा दास, नागपूर (इंटरनॅशनल आर्टीस्‍ट आकाशवाणी रेडीओ सिंगर) यांचा साई भजन संध्‍या हा कार्यक्रम
 • रात्रौ १०.३० वा. श्रींची शेजारती होईल.

 

साई दर्शनासाठी उत्सव काळात शिर्डीमध्ये येणार्‍या भाविकांसाठी, पदायात्रेकरूंसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. भक्त निवास सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.