Makar Sankranti 2023 Messages (PC- File Image)

Makar Sankranti 2023 Messages: मकर संक्रांती (Makar Sankranti) हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. हा सण संपूर्ण भारतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. हा सण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण कधी कधी हा सण 15 जानेवारीलाही येतो. सूर्य धनु राशीतून कधी मकर राशीत प्रवेश करतो यावर ते अवलंबून असते. या दिवशी सूर्याचे उत्तरायण संचलन सुरू होते आणि म्हणूनच याला उत्तरायणी असेही म्हणतात.

जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत येते. या वर्षी 14 जानेवारी रोजी रात्री 08.57 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. यावर्षी मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास Greetings, WhatsApp Status, Images, Wallpapers शेअर करत खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Makar Sankranti 2023 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे? महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या)

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा दुःखाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Makar Sankranti 2023 Messages (PC- File Image)

आठवण सूर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मनभर प्रेम,

गुळाचा गोडवा,

स्नेह वाढवा…

तिळगुळ घ्या गोड बोला.

Makar Sankranti 2023 Messages (PC- File Image)

नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे,

तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे.

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Makar Sankranti 2023 Messages (PC- File Image)

हलव्याचे दागिने, काळी साडी…

अखंड राहो तुमची जोडी

हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

Makar Sankranti 2023 Messages (PC- File Image)

तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोडवा येवो जीवनाला,

यशाची पतंग उडो गगना वरती,

तुम्हास अणि तुमच्या परिवारास..

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Makar Sankranti 2023 Messages (PC- File Image)

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो

पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…

मकरसंक्रांती हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड बोला

Makar Sankranti 2023 Messages (PC- File Image)

संक्रांतीचा शुभ मुहूर्त रविवारी येत आहे. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. यावेळी या दिवशी रविवार येत असल्याने हा दिवस आणखी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जातो. या दिवसापासून खरमास संपेल आणि शुभ कार्यास सुरुवात होईल. जेव्हा सूर्यदेव उत्तरायण असतो, तेव्हा हळूहळू दिवसाचा कालावधी वाढू लागतो. म्हणजे हिवाळा कमी होऊन तापमान वाढू लागते.