भारतामध्ये 23 मार्च हा दिवस शहीद दिवस (Shaheed Diwas) अर्थात Martyr's Day म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने शहीदांप्रति आदरांजली अर्पण केली जाते. शहीद दिवसाच्या निमित्ताने भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचं देखील स्मरण केले जाते. भारतमातेच्या या तीन सुपुत्रांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ब्रिटीश सत्तेविरूद्ध आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा देखील झाली होती. त्यांच्या या त्यागाला अभिवादन करत हा इतिहास पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही यंदा शहीद दिवसानिमित्त काही मेसेजेस, HD Images सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages द्वारा नक्की शेअर करू शकता.
ब्रिटिशांनी 23 मार्च 1931 साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये संध्याकाळी 7.30 वाजता फाशी दिली होती. वयाच्या 23व्या वर्षी फासावर चढलेले भगतसिंग पुढे देशाचे आदर्श बनले. ब्रिटिशांची सत्ता उलथून लावण्यासाठी भारतीयांची स्वातंत्र्याची चळवळ त्यांच्या फाशीने अधिक तीव्र झाली. हे देखील नक्की वाचा: शहीद दिवसाची तारीख, माहिती आणि इतिहास जाणून घ्या.
शहीद दिवस 2022 इमेजेस
यंदा पंजाब मध्ये शहीद दिवसानिमित्त राज्य सरकारने स्थानिकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. भारतामध्ये 6 दिवशी शहीद दिवस पाळला जातो. 30 जानेवारी हा एक शहीद दिवस आहे. त्यानंतर 23 मार्च, 19 मे हा भाषा शहीद दिवस, 21 ऑक्टोबर हा पोलिस शहीद दिवस, 17 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर हे दिवस देखील शहीद दिवस म्हणून विविध कारणांसाठी पाळले जातात.