Sant Tukaram Palkhi Sohala 2020| Photo Credits: Facebook @TukaramMaharajDehu

Pandharpur Wari 2020: महाराष्ट्रामध्ये आजपासून आषाढी एकादशी वारीच्या (Ashadhi Ekadashi Wari)  सोहळ्याला सुरूवात झाली आहे. यंदा महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचं संकट असल्याने पालखी सोहळ्यांचं स्वरूप बदललं आहे. आज तुकाराम महाराज (Sant Tukaram) आणि एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) यांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान मध्यान्ह म्हणजेच सुमारे 12 च्या सुमारास मोजक्याच वारकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये भजन, कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. देहू येथून आज तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवेल तर औरंगाबादच्या पैठण येथून संत एकनाथांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. मात्र यंदा या दोन्ही पालख्या मंदिरामध्येच ठेवल्या जाणार आहेत. 30 जून म्हणजे दशमीला पादुका केवळ विशेष वाहनांनी पंढरपुरामध्ये दाखल होतील. जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम.  

आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा असतो परंतू यंदा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे देहू, पैठण आज सुन सुन आहे. पण या पालखी प्रस्थान सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आणि काही क्षणचित्र फेसबुक लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यामातून यंदा महाराष्ट्रासोबतच देशा-परदेशातील वारकरी आणि विठुमाऊलींच्या भक्तांना पाहता येणार आहेत.

तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2020 ची क्षणचित्रं

तुकोबांचे पंढरीकडे प्रस्थान !

पालखी पूजन- आरती 

आज दुपारी 2 च्या सुमारास तुकोबा रायांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणेला सुरूवात झाली आहे.

शिळा मंदिर 

प्रस्थान सोहळ्याची ह.भ.प. पुंडलीक महाराज देहूकर यांची कीर्तनसेवा

आज तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज यांच्या पालखी यांचे प्रस्थान झाल्यानंतर उद्या आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. दरम्यान देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याने तेथे कमाल 50 जणांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास परवानगी आहे. तर पैठणच्या सोहळ्यात 20 वारकरी उपस्थित राहतील.