![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/06/Sant-Dnyaneshwar-Palkhi-Prasthan-Images_1-380x214.jpg)
संत तुकाराम महाराजांच्या पाठोपाठ आज आळंदी (Aalandi) मधून संत ज्ञानेश्वर अर्थात माऊलींच्या पालखीचं (Sant Dnyaneshwar Palkhi) प्रस्थान होणार आहे. 17 जुलै ला साजर्या होणार्या आषाढी एकादशी ला विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामधून वारकरी बांधव, देहू किंवा आळंदी मध्ये येऊन पालखी सोबत आपला प्रवास सुरू करतात. मग आज माऊलींच्या पालखीसोबत जाणर्या वारकरी बांधवांना तुम्ही शुभेच्छा देत त्यांचा वारीसोबतचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी WhatsApp Status, Facebook Message, Greetings, Wishes, HD Images शुभेच्छा देऊ शकता.
एकादशीच्या दिवशी वारी पंढरपूरला पोहोचल्यानंतर वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष करतात. हा संपूर्ण उत्सव आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी संपतो. Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg 2024 Schedule: संत ज्ञानेश्वरी माऊलींची पालखी यंदा 29 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा रिंगण, मुक्कामांच्या तारखांसह संपूर्ण वेळापत्रक!
ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा शुभेच्छा
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Sant-Dnyaneshwar-Palkhi-Prasthan-Images_5.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Sant-Dnyaneshwar-Palkhi-Prasthan-Images_4.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Sant-Dnyaneshwar-Palkhi-Prasthan-Images_3.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Sant-Dnyaneshwar-Palkhi-Prasthan-Images_2.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/06/Sant-Dnyaneshwar-Palkhi-Prasthan-Images_1.jpg)
आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदी येथे दर्शन मंडप इमारत गांधीवाडा मध्ये असेल. 30 जून रोजी आळंदीहून पुण्याच्या दिशेनं पालखी मार्गस्थ होणार आहे.