Sankashti Chaturthi August 2019: श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थी चा आज जुळून आला योग; पहा उपवास सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ काय?
Lord Ganesha | Sankashti Chaturthi | (Photo Credits: Pixabay)

Sankashti Chaturthi August 2019 Moon Rise Time: आज (19 ऑगस्ट) श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि त्याच्या सोबतीला संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे या महिन्यातील संकष्टी खास आहे. व्रत वैकल्यांनी श्रावण महिना सजलेला असतो. त्यामध्ये आज श्रावणी सोमवार आणि संकष्टी चतुर्थीचा योग जुळून आला आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी.या ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashta Chaturthi)ही श्रावणात आल्याने खास बनली आहे. आज गणेशभक्त या दिवशी गणपती सोबतच भगवान शंकराची देखील मनोभावे पूजा करणार आहेत. अनेक जण महिन्यातून एकदा येणार्‍या या संकष्टी दिवशी उपवास करतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास आज रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा झाल्यानंतर सोडतात. मग तुम्ही देखील आज संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार असाल तर पहा तो सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ काय? नक्की वाचा: Shravan Somvar 2019 Date: शिवभक्तांसाठी खास असलेल्या श्रावणी सोमवार व्रत यंदा चार दिवस; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?

श्रावणी सोमवारच्या आजच्या संकष्टी चंद्रोदयाची वेळ

19 ऑगस्ट 2019 दिवशी चंद्रोदय रात्री 21:57 होणार आहे. त्यामुळे उपवास करणार असाल तर संकष्टीचा उपवास तुम्हांला रात्री रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सोडता येणार आहे.

संकष्टीच्या रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची विधीवत पूजा केली जाते. आरती करून नैवैद्य दाखवला जातो. गणपतीला दुर्वा, जास्वंद प्रिय असल्याने त्याचा पूजेमध्ये समावेश केला जातो. तर कांदा लसूण विरहीत जेवणासोबत उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखवण्याची रीत आहे. Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थी निमित्त उपवासाचे बटाटे वडे कसे बनवाल?

श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची विशेष प्रथा आहे. संकष्टी चतुर्थी दिवशी आज गणरायाचे पिता असलेल्या शंकरासोबत त्याची पूजा करण्याचा हा योग तुमच्या आयुष्यात येणारे सुख, समृद्धी, मांगल्य द्विगुणित करणारं असावं हीच आमची कामना.