Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थी निमित्त उपवासाचे बटाटे वडे कसे बनवाल?
Potato Vada (Photo Credit: Wikimedia Commons)

Sankashti Chaturthi February 2019: आज संकष्टी चतुर्थी असून अनेक गणेशभक्त संकष्टी निमित्त उपवास करतात. उपवासाच्या दिवशी नेमकं काय फराळ घ्यावा? हा प्रश्न अनेकींना पडतो. नेहमीचीच साबुदाणा खिचडी आणि वडे खावून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे उपवासानिमित्त काही वेगळा पदार्थ मिळाला तर कोणालाही आवडेलच. तर पाहुया उपवासाचे बटाटेवडे करण्याची रेसिपी... संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? आज चंद्रोदयाची वेळ पाहूनच सोडा 'संकष्टी चतुर्थी'चा उपवास

साहित्य:

# उकडलेले बटाटे- 2

# वरीचे पीठ- 1 वाटी

# जिरं- 1 चमचा

# आलं

# मिरच्या-2-4

# साखर - 1 चमचा

# मीठ- चवीनुसार

# तेल

कृती:

उकडलेले बटाटे एका भांड्यात कुस्करून घ्या. त्यात चिरच्या, आलं आणि जिऱ्याची पेस्ट घाला. चवीनुसार मीठ घाला. चमचाभर साखर घालून मिश्रण नीट मिक्स करा. त्यानंतर मिश्रणाचे लहान लहान गोळे करा. वरीच्या पीठात पाणी आणि थोडंस तेल घालून पीठ अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही, असं भिजवा. वरीच्या पिठात वडे घोळवून गरम तेलात तळा. खमंग, खुसखुशीत, गरामगरम उपवासाचे बटाटा वडे तयार.

संकष्टी निमित्त आज उपवास असल्यास साधे सोपे उपवासाचे वडे नक्की ट्राय करुन पहा.