संकष्टी (Photo Credits: File Photo)

Sankashti Chaturthi February 2019 Date:  दर महिन्यात येणार्‍या येणार्‍या संकष्टी चतुर्थीचं (Sankashti Chaturthi) खास महत्त्व असतं.  काही गणेशभक्त या दिवशी उपवास करतात तर काही केवळ गणपतीची पूजा करतात. मात्र विघ्नहर्ता गणपतीला संकष्टी दिवशी प्रसन्न करण्यासाठी काय आहे आज संकष्टी चतुर्थी दिवसाची महत्त्व आणि  पूजा हे तुम्हांला ठाऊक आहे का? फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 दिवशी आहे. आयुष्यामध्ये वाईट गोष्टी, संकट यांना दूर ठेवण्यासाठी संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा करावी असं सांगण्यात आलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी?

हिंदू दिनदर्शिकेनुसार, महिन्यात दोनदा चतुर्थी येते. एक कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये येते. शास्त्रानुसार चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. अमावस्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी विनायकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर पौर्णिमेतील कृष्ण पक्षातील चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी 22 फेब्रुवारी दिवशी आहे.

फेब्रुवारी 2019 संकष्टी चंद्रोदय वेळ काय?

संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवसभराचा उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

चंद्रोदय वेळ : संध्याकाळी 9.36

संकष्टी दिवशी काय करावे?

संकष्टी दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. यादिवशी सकाळी उठून घरी गणपतीची पूजा केली जाते तसेच गणपती मंदिरामध्ये गणेशाची पूजा आणि दर्शन घेतले जाते. शक्य असल्यास गणेशभक्त उपवास ठेवतात. संकष्टी दिवशी लसुण, कांदा विरहीत जेवण बनवलं जातं. नैवेद्याला गोडाचा पदार्थ किंवा मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे !

आयुष्यातील वाईट प्रसंगांचा सामना करण्यासाठी, आर्थिक, मानसिक, अध्यात्मिक सुख मिळवण्यासाठी गणपतीची पूजा केली जाते. कोणत्याही शुभकार्यामध्ये गणपतीला पहिलं स्थान दिलं जातं. त्यामुळे सुख-समृद्धीसाठी दर महिन्यात येणार्‍या संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची पूजा करणं फायद्याचं समजलं जातं.