Shravani Somvar (File Photo)

Shravan Somvar 2019  Vrat:  श्रावण हा हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानला जाणारा महिना यंदा महाराष्ट्रात आज ( 2 ऑगस्ट ) पासून सुरू झाला आहे. आषाढी अमावस्येनंतर आता श्रावण महिन्याला (Shravan Month) सुरूवात झाली आहे. या महिन्याभरात व्रत वैकल्य, सणांची रेलचेल यांच्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी किमान एक धर्मकृत्य करण्याची प्रथा आहे. त्यामुळे श्रावन माहिन्यातील सोमवार (Shravan Somvar) हा शिवभक्तांसाठी खास असतो. Shravan Mas 2019 Wishes & Messages: श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी HD Images, Quotes, Greetings, Messages शेअर करुन साजरा करा श्रावणमासारंभ!

महाराष्ट्रात श्रावणी सोमवार व्रत करणार्‍यांमध्ये या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. या दिवशी शंकराच्या मंदिरात बेल, दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. तसेच श्रावणी सोमवारी एका विशिष्ट धान्याचं मूठभर दान देण्याचीदेखील प्रथा आहे. मग पहा यंदा चार श्रावणी सोमवार कधी आहेत? आणि कोणत्या दिवशी कोणत्या धान्यांची मूठ दान द्यावं हे नक्की पहा. Jara Jivantika Puja 2019: यंदा कोणत्या श्रावणी शुक्रवारी कराल जिवंतिका देवीचे पूजन, जाणून घ्या पूजेचे विशेष महत्व

श्रावणी सोमवार 2019 वेळापत्रक

पहिला श्रावणी सोमवार

तारीख - 5 ऑगस्ट 2019

मूठ - तांदूळ

दुसरा श्रावणी सोमवार

तारीख - 12 ऑगस्ट 2019

मूठ - तीळ

तिसरा श्रावणी सोमवार

तारीख - 19 ऑगस्ट 2019

मूठ - मूग

चौथा श्रावणी सोमवार

तारीख - 26 ऑगस्ट 2019

मूठ - जवस

श्रावणी सोमवार महत्त्व

श्रावण महिन्यात व्रत वैकल्य आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. अनेकजण श्रावणी सोमवारी उपवास करतात. या दिवशी शिव शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याची आराधना केली जाते. समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. तसेच कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात. पौराणिक कथांनुसार पार्वतीनेही श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत केले, महादेवाला प्रसन्न केले आणि विवाह केला.

(टीप- सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. या लेखातील मतांचे लेटेस्टली कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाही.)