Happy Shravan Maas 2019: श्रावण मास हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची (Shravan Month) सुरूवात आज (2 ऑगस्ट 2019) पासून होत आहे. या महिन्यात नियमित प्रत्येक दिवशी एक धर्मकृत्य करण्याची पद्धत आहे. नागपंचमी पासून पिठोरी अमावस्या पर्यंत श्रावण महिन्यात सणांची, व्रत वैकल्यांची रेलचेल असते. त्यामुळे सहाजिकच हा महिना चैतन्यमय, मंगलमय असतो. मग या पवित्र पर्वाचा आनंद तुमच्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबियांसोबत शेअर करायचा असेल तर आज व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Quotes, Greetings, Messages शेअर करण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र नक्की शेअर करा.
श्रावण माहिन्यात सोमवारी शंकराची पूजा, मंगळवारी मंगळागौर पूजन, बुधवारी बुधपूजन, गुरूवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन, शनिवारी अश्वत्ध पूजन आणि रविवारी आदित्य पूजन करण्याची प्रथा आहे. मग हा मंगलदायी महिना तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान घेऊन येवो हीच आमची प्रार्थना! (Shravan 2019 Wishes & Images: श्रावण महिन्याच्या शुभेच्छा Wishes,Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा )
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
- श्रावणमासारंभ
- हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- श्रावण महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा
- श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावण हा चातुर्मासातील महत्त्वाचा महिना मानला जातो.या ऋतूत ढगाळ, पावसाचे वातावरण सोबत कमजोर झालेली पचनशक्ती यामुळे हलका आहार घेणं आरोग्याला फायदेशीर आहे. त्यामुळेच या महिन्यात उपवास-तापासाचे अधिक महत्त्व आहे.