Shravan 2019 Wishes & Images: श्रावण महिन्याच्या शुभेच्छा Wishes,Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्या  पवित्र पर्वाच्या शुभेच्छा
Shravan Wishes 2019 (File Photo)

Maharashtra Shravan 2019 Marathi Messages & Wishes: श्रावण हा हिंदू कॅलेंडरनुसार पवित्र महिन्यांपैकी एक समजला जातो. या महिन्यापासून सणांची रेलचेल, व्रत वैकल्यांचा काळ सुरू होतो. त्यामुळे या काळात अनेक उपवास, भक्ती करून देवाची आराधना केली जाते. पावसाळ्याच्या दिवसात श्रावण महिना (Shravan Month) येत असल्याने शरीराची कमजोर झालेली पचनशक्ती लक्षात घेता योग्य पद्धतीने केलेले उपवास हे केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा 2 ऑगस्ट पासून श्रावण मासारंभ होणार आहे. आषाढ अमावस्येनंतर श्रावणाला सुरूवात होते. त्यामुळे आज (1 ऑगस्ट) पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात सुरू होणार्‍या या श्रावण महिन्यासोबत तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, शांती, मांगल्य नांदो यासाठी प्रार्थना करून या नव्या पर्वाच्या शुभेच्छा नक्की शेअर करा. August 2019 Festivals Calendar: व्रतवैकल्य आणि सणावारांनी सजलेला असा ऑगस्ट महिना; पहा सणावारांची संपूर्ण यादी

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

Shravan Wishes 2019 (File Photo)
Shravan Wishes 2019 (File Photo)
Shravan Wishes 2019 (File Photo)
Shravan Wishes 2019 (File Photo)
Shravan Wishes 2019 (File Photo)

महाराष्ट्रमध्ये आषाढी अमावस्या आज 1 ऑगस्ट दिवशी सकाळी 8.42 वाजता संपणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रभरात श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात नागपंचमी, गोकुळाष्टमी, बैलपोळा असे विविध सण साजरे होणार आहेत. 30 ऑगस्ट दिवशी महाराष्ट्रात श्रावण महिना संपेल.

श्रावणातील ऊन- पावसाचा चालणारा खेळ, त्याच्या सोबतीला असणारे सण-उत्सवाचे मंगलमय वातावरण यामुळे सारेच वातावरण चैतन्यमय असते.