Sambhaji Maharaj Jayanti 2022 Wishes in Marathi: मराठा सम्राट असण्यासोबतच संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी भारतातील पुणे राज्यात झाला. त्यांना छत्रपती संभाजी राजे या नावानेही ओळखले जाते. 1689 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्याच्या धाडसी आणि जिद्दीमुळे सर्वजण त्याला ओळखत होते. भारतातील औरंगजेबासारख्या क्रूर मुघल राजाची राजवट संपवण्यात छत्रपती संभाजी राजे यांचा महत्त्वाचा वाटा होता.
छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण 120 लढाया जिंकत पराक्रम गाजवला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे ते खरे उत्तराधिकारी होते. 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शंभूराजे मराठा साम्राज्याचे ते दुसरे छत्रपती झाले. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त SMS, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून शंभूराजांना अभिवाद करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. या ईमेज तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि याद्वारे आपल्या मित्र-मैत्रिणींना संभाजी महाराज जयंतीच्या खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Sambhaji Maharaj Jayanti 2022 Messages: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Facebook Wallpaper, Images शेअर करत द्या खास शुभेच्छा)
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना, संभाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक “मर्द मराठा संभाजी” होऊन गेला…
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी, जय शंभुराजे
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जिथे संभाजीभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे संभाजी छत्रपती……!!
“!!! जय संभाजी महाराज !!!”
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुमच्या सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करण्यासाठी वरील ईमेज तुमच्या नक्की उपयोगात येतील. या ईमेज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास शुभेच्छा देऊ शकता.