Sambhaji Jayanti 2019 Whatsapp Messages: अंगात दहा हत्तींचे बळ आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची छाप पाडतील हे व्हॉट्सअॅप टेक्स्ट मेसेजेस
Sambhaji Maharaj Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)

Sambhaji Maharaj Jayanti 2019 Whatsapp Text Messages: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीवर बसण्यास साजेसे असलेले कुशल, बुद्धिमान, पराक्रमी, धुरंदर अशा छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर आई सईबाईंच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला. संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. आज संभाजी महाराजांच्या निमित्त प्रत्येक मराठ्याच्या मोबाईलमध्ये संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छांचे मेसेज अथवा आपल्याला पाहायला मिळतील. त्यात भर म्हणून आम्ही असे काही मेसेजेस सांगणार आहोत, जे नक्कीच तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शोभून दिसतील...

पाहा काही व्हॉट्सअॅप स्टेटस टेक्स्ट मेसेजेस.......

 

  1. “ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,

    “साई” बोलल्याने मनाला भक्ती मिळते,

    “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,

    “जय संभाजी” बोलल्याने

    आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…

2. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,

श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराजांना,

त्रिवार मानाचा मुजरा…

सर्व शिवभक्तांना,

संभाजी महाराज शिवमय शुभेच्छा…!!

3. जिथे संभाजीभक्त उभे राहतात

तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!

अरे मरणाची कुणाला भीती

आदर्श आमचे राजे संभाजी छत्रपती……!!

“!!! जय संभाजी महाराज !!!”

4. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर केवळ ९ वर्षात

स्वराज्याचा ५ पट विस्तार आणि खजिना दुप्पट करणारया,

आपल्या पराक्रमाने व गनिमी काव्याने औरंगजेबाला कडवी झुंज देणा-या

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा...!!

Sambhaji Jayanti 2019 Wishes: संभाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Messages, Images आणि शुभेच्छापत्रं!

1 फेब्रुवारी 1689 रोजी कोकणातील संगमेश्वर येथील बैठक संपवून रायगडावर परतत असताना औरंगजेबाचे सैन्य संभाजी महाराजांवर चालून आले. त्यात मराठ्यांच्या आणि मुघलांच्या चकमकीत संभाजी महाराजांना औरंगजेबाने जेरबंद केले. त्यानंतर सलग 40 दिवस औरंगजेबाचा अमानुष अत्याचार सहन करुनही आपली स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली. मोडेल पण वाकणार नाही, हा नारा देत त्यांनी मुघलांचे अत्याचार सहन केले. अखेर 11 मार्च 1689 रोजी भीमा-इंद्रायणी नदीच्या संगमाजवळ आळंदीजवळच्या तुळापूर त्यांची हत्या करण्यात आली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांना गादीवर बसविण्यात आले. मात्र शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरून ठेवलेली स्वराज्याची शिकवण पुढेही मराठ्यांनी वाढवत नेली. अशा या पराक्रमी राजाला छत्रपती संभाजी महाराजांना लेटेस्टली कडून कोटी कोटी प्रणाम!!