
Sambhaji Maharaj Jayanti 2019 Marathi Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच आपल्या शौर्याने आणि कतृत्वाने महाराष्ट्राची शान ठरलेले संभाजी महाराज यांची उद्या जयंती. शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 साली पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी 9 वर्षे राज्य केले. मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज यांसारख्या अन्य शासकांविरुद्ध लढा देत त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले.
या थोर पुरुषाच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status....
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…
जय संभाजी
जय शंभुराजे!

जागवल्याशिवाय जाग येत
नाही…
ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही...
तसे,
"छत्रपतींचे" नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही…!
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला संभाजी होता
जय संभाजी!

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर जाहला
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा संभाजीछत्रपती
मानाचा मुजरा
संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, सदैव प्रजेला मदत करणारे आणि त्यांचे दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा असा राजा. संभाजी महाराजांकडे हे सर्व गुण असल्याने त्यांना छत्रपती असे संबोधले जाते.