Ramadan 2022 in India: मुस्लिम धर्मीयांचा पवित्र महिना रमजान ची यंदा कधी पासून होणार भारतात सुरूवात?
नमाज । (Photo Credits: Unsplash)

रमजान (Ramadan) हा इस्लामिक कॅलेंडर मधील नववा महिना आहे. जगभरातील मुस्लिमांसाठी हा अत्यंत पवित्र असतो. या महिन्यात रोजा (Rozah) ठेवण्याची रीत आहे. पहाटे सेहरी ते संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता- पिता महिनाभर उपवास पाळण्याची पद्धत आहे. मग हा रमजान महिना यंदा भारतामध्ये कधीपासून सुरू होणार? किती दिवस चालणार? या महिन्याभरात काय काय केले जाते हे सारं जाणून घ्या.

रमजान हा अत्यंत पवित्र महिना आहे. रोझा पाळणार्‍यांसाठी विशिष्ट नियम असतात. दरम्यान वाईट विचार, गोष्टी या काळात निषिद्ध असतात. भारतात यंदा रमजान महिन्याची सुरूवात 2 एप्रिल 2022 पासून होणार आहे. पुढे 29,30 दिवस अर्थात चंद्र दर्शनावर रोजाची अखेरची तारीख अवलंबून असते. पण महिनाभर रमजान पाळला जातो.

इस्लामिक चंद्र कॅलेंडर चंद्राच्या टप्प्यांवर अवलंबून असते. जेथे महिने नवीन चंद्राच्या पहिल्या चंद्रकोराने सुरू होते आणि सूर्यास्तानंतर नवीन दिवस सुरू होतो. त्यामुळे रोझाची सुरूवात महिन्याची चंद्रकोर 1 एप्रिल, जो इस्लामिक महिन्याच्या शाबानच्या 29 तारखेला शुक्रवारी दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 एप्रिल हा भारतात रमजान 2022 चा पहिला दिवस असेल.

मुस्लिम धर्मिय या पवित्र महिन्यात दर्ग्यामध्ये जातात. अनेक तास कुराणचे पठण करण्यात, प्रार्थना करण्यात व्यथित करतात. नक्की वाचा: मुस्लिम बांधवांच्या पवित्र 'रमजान' महिन्यात कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या निषिद्ध घ्या जाणून .

दरम्यान यावर्षी मार्च 2022 ला कोरोना निर्बंध शिथिल होणार असल्याचं चित्र असल्याने पूर्वीप्रमाणे पुन्हा सण साजरा करता येणार आहे. यंंदा 2 वर्षांनी पुन्हा सामुहिक नमाज अदा करता येईल.