Ramzan (Photo Credits: Getty Images)

Ramzan 2020 Mumbai  Iftar& Sehri Timetable:  भारतामध्ये केरळ, कर्नाटक पाठोपाठ आता 25-26 एप्रिल पासून पुढील 30 दिवस महाराष्ट्रात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. दरम्यान शाबान महिन्यातील 29 व्या दिवशी चंद्रकोर पाहून पुढे रमजान महिना आणि रोझा कधी सुरू होणार याचं गणित ठरतं. त्यामुळे यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे घरीच रमजान महिन्याचं सेलिब्रेशन करणार्‍यांसाठी रोझासाठी इफ्तार आणि सेहरीच्या वेळा महत्त्वाच्या आहेत. रमजान महिन्यातील या कडक उपवासांच्या दिवसांमध्ये रोझा ठेवणारी व्यक्ती सकाळी सूर्योदयापूर्वी खाऊ शकते. ही सेहरीची वेळ असते. तर संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर 'इफ्तार'ची वेळ पाहून दिवसराचा उपवास खजूर आणि पाणी पिऊन सोडला जातो. मग यंदा तुम्ही रमजान रोझा ठेवणार असाल तर पहा मुंबई शहरामधील रमजान 2020 च्या सेहरी आणि इफ्तारच्या वेळा काय आहेत? Ramadan Mubarak 2020 Wishes: रमजान महिन्याच्या शुभेच्छा देणारी Greetings, Messages, GIFs, Images शेअर करून मुस्लीम बांधवांचा खास करा Ramadan Kareem चा पहिला दिवस!

इस्लामिक धर्माच्या शिकवणीनुसार 'रोझा' हा वर्षातून एकदा महिनाभर पाळला जाणारा उपवास त्यांच्या पाच मूलतत्त्त्वांपैकी एक आहे. सेहरीची वेळ ही सूर्योदयावर तर इफ्तारची वेळ ही सूर्यास्तावर अवलंबून असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात ही सेहरी-इफ्तारची वेळ थोडी पुढे मागे असू शकते. परंतू मुंबईमध्ये पहा यंदा रोझा सुरू करण्याची आणि संपवण्याची तारीख आणि वेळ नेमकी काय आहे? Ramadan 2020: मुस्लिम बांधवांच्या पवित्र 'रमजान' महिन्यात कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या निषिद्ध घ्या जाणून.

मुंबईतील रमजान 2020 दरम्यानच्या इफ्तार आणि सेहरीचं वेळापत्रक

रोजा तारीख सेहरीची वेळ इफ्तारची वेळ
1 25 एप्रिल  2020 04:57 18:59
2 26  एप्रिल 2020 04:57 19:00
3 27  एप्रिल 2020 04:56 19:00
4 28  एप्रिल 2020 04:55 19:00
5 29  एप्रिल 2020 04:54 19:01
6 30  एप्रिल 2020 04:53 19:01
7 01 मे  2020 04:53 19:01
8 02  मे  2020 04:52 19:02
9 03 मे  2020 04:51 19:02
10 04  मे  2020 04:51 19:02
11 05  मे  2020 04:50 19:03
12 06  मे  2020 04:49 19:03
13 07  मे  2020 04:49 19:03
14 08  मे  2020 04:48 19:04
15 09  मे 2020 04:47 19:04
16 10  मे  2020 04:47 19:05
17 11  मे  2020 04:46 19:05
18 12  मे  2020 04:46 19:05
19 13  मे  2020 04:45 19:06
20 14  मे  2020 04:44 19:06
21 15  मे  2020 04:44 19:06
22 16  मे  2020 04:43 19:07
23 17  मे  2020 04:43 19:07
24 18  मे  2020 04:42 19:08
25 19 मे  2020 04:42 19:08
26 20  मे  2020 04:42 19:08
27 21  मे   2020 04:41 19:09
28 22 मे  2020 04:41 19:09
29 23  मे  2020 04:40 19:10

रमजान महिन्यात रोझा पाळणं हा मुस्लिम धर्मियांच्या संस्कृतीचा एक भाग असला तरीही जर एखादी व्यक्ती आजारी असली, गरोदर महिला, महिलांचे मासिक पाळीचे दिवस, लहान मुलं किंवा लांबचा प्रवास करणारी व्यक्ती यांना रोझा ठेवण्यामध्ये मुभा दिली जाते. रमजान हा महिना पवित्र महिन्यांपैकी एक असल्याने या काळात संयम, स्वतःवरील नियंत्रण राखण्यचा काळ असतो.