Ram Navmi 2020 Songs: यंदा राम नवमी निमित्त ही सुंदर गाणी ऐकून साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!
Ram Navami 2020 (Photo Credits: Facebook)

Ram Navmi 2020: हिंदू पंचागांनुसार येणाऱ्या पहिल्या म्हणजेच चैत्र महिन्यात भगवान श्रीरामाचा जन्म झाला. चैत्र महिन्यात शुल्क पक्षातील नवमीला दुपारी ठीक बारा वाजता प्रभू राम यांनी जन्म घेतला. म्हणून याला 'रामनवमी' असे म्हणतात. रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशात अगदी उत्साहात साजरा केला जातो. विविध राम मंदिरांमध्ये श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा गातात, कीर्तन करतात. रामभक्तांसाठी राम जन्मोत्सव अगदी खास असतो. या दिवशी राम मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदा रामनवमीच्या उत्सवावर कोरोना व्हायरसचे सावट असल्याने अनेक राम मंदिरातील रामजन्मोत्सवाचे सोहळे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे राममंदिरात हा उत्सव अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जाईल.

यंदा 2 एप्रिल दिवशी राम नवमी असल्याने लॉकडाऊनमुळे भक्तांना राम मंदिरात जावून रामाचे दर्शनही घेता येणार नाही. त्यामुळे यंदाची रामनवमी आपल्याला घरात बसूनच साजरी करावी लागणार आहे. म्हणून यंदा रामाची ही सुंदर गाणी ऐकून रामजन्मोत्सव घरातच साजरा करा. रामनवमी निमित्त रामभक्तांसाठी काही खास गाणी. ती ऐकून तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल. (Ram Navami 2020 Date: राम नवमी यंदा 2 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व)

भगवान श्रीरामाची गाणी:

शतजन्म शोधताना या अल्बम मधील 'कौसल्येचा राम' हे सुमधूर गाणे.

'श्रीरामचंद्र कृपाळू' ही रामाची प्रार्थना.

सुधीर फडके यांच्या आवाजतातील 'राम जन्म ला गं सखे' हे सुंदर राम जन्माचे सुंदर गाणे.

'हे राम हे राम' हे तल्लीन करणारे भजन जगजितसिंग यांच्या आवाजातील राम भजन.

'रघुपती राघव राजा राम' हे सुंदर गाणे.

पृथ्वीवरील पाप वाढले, दुष्ट शक्ती लोकांना त्रास देऊ लागल्या की त्यांचा नायनाट करण्यासाठी श्री भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेतात असे मानले जाते. श्रीराम हे दशावतारातील सातवा अवतार आहेत. भारतवासियांचे आवडते दैवत असलेले श्रीराम हे मर्यादा पुरुष होते. मातृ-पितृ भक्ती, बंधू प्रेम हे गुण सर्वश्रूत आहेत. त्याचबरोबर ते एकवचनी, एकपत्नी आणि एकनिष्ठ होते.