Raksha Bandhan 2019: यंदा भाऊरायला बांधण्यासाठी घरीच बनवा हटके राखी (Watch Video)
Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

भाऊ बहिणीच्या नात्यातील सर्वात खास दिवस म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan)  खरंतर हे नातं औपचारिकतेच्या पलीकडे असल्याने मजा-मस्ती, टिंगलटवाळी हे सगळं आपसूकच एकमेकांवरील प्रेम दाखवण्याचं माध्यम बनतं. यामुळेच कदाचित अनेकदा गोड बोलणाऱ्यांपेक्षा आपल्याला एकमेकांशी भांडणाऱ्या भाऊबहिणींची जोडी पाहायला मिळते. पण एरवी तू तू मे मे सुरू असणाऱ्या या नात्यात असे सण सोहळे प्रेमाची जाणीव करून देतात. यंदा 15 ऑगस्ट ला असणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही जर का आपल्या भाऊरायासाठी काही खास करू इच्छित असाल तर स्वतःच्या हाताने बनवलेली राखी हा एकदम उत्तम पर्याय ठरेल.. चला तर मग पाहुयात घरच्या घरी कशी बनवाल हटके राखी...(Raksha Bandhan 2019: सांगली येथे महिलांनी बांधली एनडीआरएफ जवानांना राखी; पूरातून वाचवल्याबद्दल मानले आभार (व्हिडिओ) )

तिरंगी राखी

खवय्या भावासाठी राखी

काटा चमच्याने बनवा राखी

टूथपिक राखी

Raksha Bandhan 2019: काळानुसार बदलती राखी; जाणून घ्या मार्केटमधील Rakhi Trends

कॉटन बड्स राखी

यादिवशी बहीण भावाला राखी बांधते, व भाऊ बहिणीला संरक्षणरुपी भेट देतो. वास्तविकता आता सर्व सणांसारखेच याचेही स्वरूप बदलले आहे. पण नात्यातील सच्चाई आणि एकमेकांवरील प्रेम दाखवण्याची पद्धत महत्वाची असली म्हणजे झालं!