Rakhi Trends 2019: यंदा 15 ऑगस्ट हा दिवस दुहेरी आनंद घेऊन येत आहे. यंदा रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण प्रजासत्ताक दिनी येत आहे. त्यामुळे रक्षाबंधन आणि प्रजासत्ताक असा दुहेरी आनंद यंदा साजरा होणार आहे. दरम्यान, रक्षाबंधन सणाची मार्केटमधील तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मार्केटमध्ये विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी आल्याही आहेत. यात विंग कमांडर अभिनंदन, पंतप्रधान मोदी आणि देवादिकांच्या प्रतिमा असलेल्या राख्या पाहायला मिळत आहेत. यंदा बदलत्या काळानुसार राखीही बदलताना दिसत आहे. विविध प्रकारच्या राख्यांचा ट्रेण्ड (Trends) मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. नजर टाकूया बाजरातील टेण्ड करणाऱ्या राख्यांवर.
मार्केटमध्ये असलेल्या राख्यांवर स्थळ, काळ आणि प्रदेश यांनुसार वेगवेगळी छाप पाहायला मिळत आहे. काही राख्यांवर विंग कमांड अभिनंदन यांची छबी झळकत आहे. तर, काही राख्यंवर पंतप्रधान मोदी याची. चिमुकल्यांची खास पसंती असलेली कार्टून छापाची राखीही विशेष उपस्थिती दर्शवत आहे. काही भगिनींनी राखी खरेदी केली आहे. तर, काही भगिनींनी परगावी राहणाऱ्या आपल्या भावाला राखी पोस्टाने अथवा कुरीअरने पाठवलीसुद्धा.
राखी बनविणारे कलाकार हे मागणीनुसार राखी तयार करत असतात. यंदा राखी कलाकारांनी कस्टमाइज्ड गिफ्ट तयार केले आहे. यात लेदर बँड असलेली तसेच नाव लिहिलेली राखी, सोबत स्वीट बॉक्स, पोट्रेट राखी, प्रेटर्स, एक्रेलिक बोर्ड फ्रेम अशा प्रकारच्या राख्या पाहायला मिळत आहेत.
काँबो पॅक
काही विक्रेत्यांजवल काँबो पॅक राखीही पाहायला मिळत आहेत.या राख्या विशिष्ट प्रकारच्या डिझाईनने सजवल्या आहेत. यात भावाच्या गुणांचे वर्णन केल्याचे दिसते. या राख्या इतर राख्यांच्या तुलनेत काहीशा महाग आहेत. या राखीसोबत एक बॉक्सहीआहे. ज्यात चॉकलेट्स आणि काही गिफ्ट्सही ठेवता येतात. विशेष म्हणजे या राखीत भावाचा फोटोही लावता येऊ शकतो. काही राख्या तर इतक्या नाजूक आहेत की, ज्यावर तांधळावर भावाचे नाव कोरल्याचे पाहायला मिळते. (हेही वाचा,Raksha Bandhan 2019: सांगली येथे महिलांनी बांधली एनडीआरएफ जवानांना राखी; पूरातून वाचवल्याबद्दल मानले आभार (व्हिडिओ) )
कार्टून राखी लहानग्यांचा आनंद
लहान मुलांची मानसिकता पक्की लक्षात घेऊन राखी बनविणाऱ्या कलाकारांनी कार्टूनला प्रधान्य दिले आहे. यात छोटा भीम, चुटकी, डोरिमॉन, मोटू पतलू, निंजा, मिकी माऊस, टेडी यांसारख्या एक ना अनेक कार्टूनची रेलचेल असलेल्या राख्या पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीत एक महत्तवाचा असलेला सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते. या निमित्ताने बहिण भाऊ आणि घरातील लोक एकमेकांना भेटत असतात. घरातील सर्वांसाठी हा मोठा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. बदलत्या काळानुसार आज या सणाचेही रुपडे बदललेले पाहायला मिळते.