Valentine’s Day 2019: 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हेलेंटाईन डे चे काऊंट डाऊन सुरु झाले आहे. तर आज व्हेलेंटाईन आठवड्यातील दुसरा दिवस म्हणजेच प्रपोज डे चे सर्वत्र सेलिब्रेशन करताना प्रेमीयुगलुक दिसून येतील. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारी पासून व्हेलेंटाईन वीकला सुरुवात होत असून 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी प्रिय व्यक्ती आपल्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी आणि कबुली करण्यासाठी प्रियकराला आपल्या मनातील गोड गुपित एका आगळ्यावेगळ्या पद्धतींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात.
मात्र काही प्रेमवीरांना आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोज कसे करायचे किंवा प्रपोज करण्यासाठी कोणता युक्तीवाद करायचा याबाबत भीती वाटते. तर थांबा आणि आधी हे वाचून या सोप्या आयडिया वापरुन तुमच्या प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट सांगा.
1. प्रियकराला छानसे सरप्राईज द्या
जर तुम्ही आजवर तुमच्या प्रिय व्यक्तीला मनातील गोड गुपित सांगतिले नसेल तर प्रपोज डेच्या दिवसाची संधी साधून त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट सांगा. त्याचसोबत एका हटक्या पद्धतीने तुम्हाला प्रिय व्यक्तीला ती गोष्ट सांगायची असेल तर आधी त्यासाठी एक छानसे सरप्राईज देऊन त्या व्यक्तीला खूश करा.
2. बाहेर फिरायला घेऊन जा
तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला एका खास अंदाजात मनातील गोष्ट सांगायची असेल तर या दिवशी बाहेर फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीला तुम्हाला प्रपोज करता येईल. तसेच एखादी छानसी कविता तुम्ही लिहिलेली ऐकवलीत तर प्रिय व्यक्तीला खूपच भारी वाटेल.
3. चित्रपट पाहायला घेऊन जा
तुनच्या प्रियकराला चित्रपट पाहण्याची खूप आवड असेल तर चित्रपटाचे तिकिट काढून तुमचा दिवस आनंदात घालवू शकता. त्याचसोबत एखादा रोमँटिक चित्रपट या दिवशी पाहिल्यास चित्रपटातील रोमँटिक दृष्याच्या वेळी त्याच अंदाजात त्या व्यक्तीला प्रपाोज करा. (हेही वाचा-Happy Propose Day 2019: 'या' खास ठिकाणी केलेलं प्रपोज प्रिय व्यक्तीच्या कायम लक्षात राहील!)
4. लाँन्ग ड्राईव्हला जा
खूप प्रेमवीरांना आपल्या प्रिय व्यक्तीसोबत लाँन्ग ड्राईव्हला जाण्यास आवडते. तर प्रमोज डे च्या दिवशी तुमच्या पार्टनरला लाँन्ग ड्राईव्हला घेऊन जाऊन रोमँटिक पद्धतीने त्या व्यक्तीला तुम्ही प्रपोज करु शकता.
5.घाबरु नका, मनातील गोड गुपित उलगडा
तुमच्या मैत्रीचे जर प्रेमात रुपांतर होत असेल किंवा झाले असल्यास प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट सांगण्यासा घाबरु नका. तर एक चांगला मित्र/ मैत्रिण एकमेकांच्या मनातील गोष्ट पटकन ओळखतो. त्यामुळे घाबरु नका, विश्वासाने प्रिय व्यक्तीला प्रपोज करा.
6.पार्टनरला करा इंप्रेस
जर तुम्हाला एखादी व्यक्ती मनापासून खूप आवडत असेल तर त्या व्यक्तीला इंप्रेस करणं खूप महत्वाचे असते. तर एका आगळ्यावेगळ्या मार्गाचा अवलंब करुन प्रिय व्यक्तीला इंप्रेस करत तिला प्रमोज करा. तुम्हाला नक्कीच उत्तर 'हो' मिळेल.
7.सोशल मीडियाचा आधार घ्या
आजच्या या डिजीटल जगात प्रत्येक जण सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेला पाहायला मिळतो. प्रपोज डेच्या दिवशी प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट सांगायची असेल तर तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहचवा. तसेच तुमच्या भावना पोहचविण्यासाठी एक खास व्हिडिओ ही तुम्ही तयार करु शकता.
अशा पद्धतींचा अवलंब करुन तुम्ही प्रपोज डेच्या दिवशी प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट सांगा.