Happy Propose Day 2019: 'या' खास ठिकाणी केलेलं प्रपोझ प्रिय व्यक्तीच्या कायम लक्षात राहील!
Propose Day (Photo Credits: Pixabay)

Valentine’s Day 2019: प्रेमाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) मधील आजचा दुसरा दिवस म्हणजेच प्रपोझ डे (Propose Day 2019). तुमच्या प्रेमाची कबुली देण्याचा हक्काचा दिवस. प्रेम ही तरल, उत्सुर्फ भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. तुमचे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला तुम्ही आजच्या दिवशी प्रपोझ करुन मनातील भावना व्यक्त करु शकता. पण प्रिय व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करताना काही गोष्टींचे भान राखणे गरजेचे आहे. कारण तुम्ही व्यक्त होत असताना समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल, सुरक्षित वाटणे गरजेचे आहे. प्रपोज करण्याच्या खास शैलीवरुन, ढंगावरुन होकार-नकारही ठरु शकतो. म्हणून प्रपोज करण्यासाठी कोणत्या जागा बेस्ट ठरतील, जाणून घेऊया...

समुद्रकिनारा/बीच: जर तुमच्या प्रिय व्यक्तीला समुद्रकिनारे आवडत असतील तर तिला/त्याला कमी गर्दीच्या असलेल्या बीचवर घेऊन जा. ती व्यक्ती खूश असणे अत्यंत गरजेचे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील थंड हवा मूड रिफ्रेश करेल. (हॅपी प्रपोझ डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings, GIF Images शेअर करून बिनधास्त करा 'प्रपोझ'!)

तलाव/लेक: तलावाकाठी प्रपोझ करणं ऐकूनच किती रोमांटीक वाटतं. जर तिला/त्याला तलावकाठी फिरणं, गप्पा मारणं आवडत असेल तर तुम्ही तसा प्लॅन करु शकता.

धबधबा: उंचावरुन पडणाऱ्या पाण्याच्या आवाजात, निसर्गाच्या सानिध्यात तिला/त्याला प्रपोझ केलेलं नक्कीच आवडेल. (Rose Day ते Valentine’s Day पहा कसं असेल हे आठवड्याभराचं Romantic सेलिब्रेशन)

Rooftops: तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोझ करुन तो दिवस सदैव आठवणीत राहावा असं वाटत असेल तर Rooftops हा हटके ऑप्शन आहे. जगापासून दूर जात खास क्षण अधिक खास करु शकता.

Dance Places: संगीत, नृत्याची आवड असल्यास प्रपोझ करण्यासाठी Dance Places हा देखील चांगला पर्याय आहे. एकत्र नाचताना केलेलं प्रपोज तिच्या/त्याच्या कायम लक्षात राहील.

कॉन्सर्ट: काहीशी गर्दी-गोंधळ असलेली जागा. पण जर तिला/त्याला आवडत असेल तर नक्की तसा प्लॅन करु शकता.

Food places: झटपट मूड सुधारण्याचा सोपा उपाय म्हणजे उत्तम खाद्यपदार्थ. तिच्या/त्याच्या एखाद्या आवडत्या रेस्टोरन्टमध्ये न्या. आवडीचा पदार्थ ऑर्डर करा आणि नात्याची गोड सुरुवात करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका.

प्रपोज करण्याचे अनेक मार्ग, जागा, स्टाईल्स आहेत. पण त्याची निवड तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आवडीनुसारच करा. कारण हाच तिचे/त्याचे मन जिंकण्याचा सोपा मार्ग आहे.