Happy Propose Day 2019:  'हॅपी प्रपोझ डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings, GIF Images शेअर करून बिनधास्त करा 'प्रपोझ'!
Happy Propose Day wishes 2019 (file Photo)

Valentine’s Day 2019: व्हेलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. 7 ते 14फेब्रुवारी 2019 या प्रेमाच्या आठवड्यात प्रत्येक दिवशी एक खास दिवस सेलिब्रेट केला जातो. 'रोझ डे' नंतर व्हेलेंटाईन वीकमध्ये (Valentine Week)  दुसरा दिवस 'प्रपोझ डे' (Propose Day 2019) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, नवरा-बायको त्यांच्या नात्यातील प्रेमाची भावना एकमेकांसोबत शेअर करतात. प्रेम वेळीच व्यक्त करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग व्हेलेंटाईन डे चा दुसरा दिवस 8 फेब्रुवारी हा अजून रोमॅन्टिक बनवायचा असेल, तुमच्या साथीदाराला प्रपोज करणं अजून थोडं सुकर करायचं असेल तर तुमच्या मनातील प्रेमाच्या भावना या काही मेसेजेस आणि ग्रिटिंग्समधून शेअर करायला नक्की मदत करतील. Valentine’s Day 2019: Rose Day ते Valentine’s Day पहा कसं असेल हे आठवड्याभराचं Romantic सेलिब्रेशन

'हॅपी प्रपोझ डे' 2019  ग्रिटिंग्स,मेसेजेस  

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…!

Happy Propose Day 2019
Happy Propose Day 2019 (File Photo)

होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…

Happy Propose Day 2019
Happy Propose Day 2019 (File Photo)

ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?

Happy Propose Day 2019
Happy Propose Day 2019 (File Photo)

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 

Happy Propose Day 2019
Happy Propose Day 2019 (File Photo)

'हॅपी प्रपोझ डे' 2019 WhatsApp, Facebook Status 

'हॅपी प्रपोझ डे' 2019 GIF Images 

via GIPHY

नात्याची कबुली द्यायची असेल तर मुलानेच मुलीला प्रपोझ करायला पाहिजे असं काही नाही. आज मुली देखील सुपरस्ट्रॉंग झाल्या आहेत. मग जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर मुलींनो ! त्याची वाट बघत राहू नका आणि रिलेशनशीपमध्ये एक पाऊल पुढे या आणि प्रेमाची कबुली द्या