Padwa Gifts Ideas 2019: दिवाळी पाडव्या निमित्त बायकोला द्या ‘हे’ खास गिफ्ट
Gifts For Our Teacher (Photo Credits: Instagram)

Diwali 2019: दिवाळीत येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाला 'दिवाळी पाडवा' (Diwali Padwa) असे म्हटले जाते. तसं दिवाळी पाडव्याला 'बलिप्रतिपदा' असंही संबोधले जाते. यावेळी दिवाळी पाडवा 28 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार असून हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. या दिवसापासून कोणतेही शुभ काम करण्याची प्रथा परंपरेने चालत आली आहे. विवाहित महिला या दिवशी पतीला अभ्यंगस्नानानंतर औक्षण करतात. त्या बदल्यात त्यांचे पती ओवाळणीत काही दाग-दागिना देतात अशी रित आहे.

सध्या बदलत्या काळानुसार पत्नींच्या मागण्याही बदलल्या असतील असं म्हणायला हरकत नाही. त्यात बाजारात दागदागिन्यांसह अन्य बरेच गॅजेट्सहीदेखील आले आहेत. म्हणून यंदाचा पाडवा आपल्या बायकोसाठी स्पेशल बनविण्यासाठी ओवाळणीत देता येईल अशा 5 भन्नाट गिफ्ट आयडियाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या गिफ्ट आयडिया...

हेही वाचा - Diwali Safety Tips: अस्थमा, हृदय विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी दिवाळीत अशी स्वत:ची काळजी

गॅजेट्स: (Gadgets)

सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार महिलांनाही या आधुनिक तंत्रांचे वेडं लागले आहे. यात मोबाईल्स, ब्लूटुथ, सारेगमपा कारवा अशा ब-याच गॅजेट्सचा समावेश आहे. तसेच तुमची पत्नी जर फिटनेस फ्रिक असेल तर तुम्ही त्यांना स्मार्टबँड देऊ शकता.

सौंदर्यप्रसाधने - 

ब-याच महिलांना सौंदर्यप्रसाधने प्रिय असतात. कुठे काही घरगुती समारंभ असला, पार्टी असली, सण असला तर महिलांना साजशृंगार करुन त्यासोबत थोडा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करायला आवडते. अशावेळी बाजारात मिळणारे ब्रँडेड किंवा तुमच्या बजेटमधील सौंदर्यप्रसाधने तुम्ही तुमच्या पत्नीस गिफ्ट म्हणून देऊ शकता.

हेही वाचा - Laxmi Pujan Rangoli Designs: लक्ष्मीचं पाऊलं रांगोळीच्या माध्यमातून साकारून झटपट आणि सहजसोप्या डिझाईन्स साकारून करा लक्ष्मी मातेचं स्वागत! (Watch Video))

 

साड्या/ड्रेसेसः 

तुमच्या पत्नीस ज्या साड्या परिधान करण्यास आवडतात किंवा ज्या प्रकारच्या साड्या तिने नेसाव्या अशी तुमची इच्छा असेल ती साडी तुम्ही तिला गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर सध्या नोकरदार महिलांना साड्यांपेक्षा ड्रेसेस किंवा वेस्टर्न आऊटफिट्स घालणे जास्त पसंत करतात त्यांना तुम्ही बदलत्या ट्रेंड त्या पद्धतीचे आऊटफिट्स घेऊ शकता.

दागिने (Jewellery)- 

सध्याच्या फास्ट लाईफमध्ये बऱ्याच स्त्रिया इमिटेशन ज्वेलरी ला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे जर तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्हाला सिया, सेनोरिटा, सोनचाफा हे चांगले ब्रँड्स आहेत. यात तुम्हाला खरे नाही मात्र सोन्याचे मुलामा चढवलेले गॅरंटी मधील आकर्षक ज्वेलरी खरेदी करता येईल. तसेच सोन्याच्या दागिन्यांविषयी बोलायचे झाले वामन हरि पेठे, पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स, तनिष्क यामध्ये तुम्हाला सोन्या-चांदीचे नवीनतम आणि आकर्षक असे कलेक्शन मिळेल. जर तुमच्या पत्नीस हि-यांची आवड असेल तर या ब्रँडमध्ये तुम्हाला हि-यांचे दागिन्यांचे देखील उत्तम कलेक्शन मिळेल.

रोमँटिक टूर (Romantic Tour) - 

जर तुम्ही बरेच आपल्या पत्नीला कुठे फिरायला घेऊन गेला नसाल किंवा तुमच्या पत्नीला प्रवासाची आवड असेल, तर तिला कुठे तरी छान रोमँटिक टूरला घेऊन जाऊ शकता. त्यासाठी प्रवास तिकिटांपासून हॉटेल बुकिंग पर्यंत सर्व फायनल करुन ते तिकिट्स तिच्या हातात दिल्यास तिच्यासाठी पाडव्याचे हे खूप स्पेशल गिफ्ट असेल.

या गिफ्ट्स आयडियाज तुमचा आणि विशेष करुन तुमच्या पत्नीचा पाडवा स्पेशल करतील.  तुम्ही घेतलेले हे हटके गिफ्ट्स तुमच्या पत्नीला नक्की आवडतील. कदातिच तुमचं गिफ्ट पाहून तुमची पत्नीदेखील तुम्हाला रिटन गिफ्ट देऊ शकते.