Rangoli Designs For Lakshmi Pujan: आज नरक चतुर्दशीच्या निमित्ताने देशभरात दिवाळीचा खरा जल्लोष सुरू झाला आहे. यंदा दिवाळी सणामध्ये सकाळी नरक चतुर्दशी आणि संध्याकाळी लक्ष्मी पूजन साजरं केलं जाणार आहे. दिवाळी हा सणच आकर्षक रोषणाई, दिव्यांची आरास आणि रंगबेरंगी रांगोळ्यांनी सजलेला आहे. मग आज संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर लक्ष्मीचं घरात स्वागत करण्यासाठी अंगणात रांगोळ्या काढल्या जातात. हिंदू पारंपारिक प्रथा आणि संस्कृतीमध्ये रांगोळी हे शुभ संकेताचं प्रतिक समजलं जातं. मग यंदा लक्ष्मीचं घरात स्वागत करण्यासाठी आकर्षक आणि सहज सोप्या रांगोळ्या झटपट काढण्यासाठी या काही लक्ष्मी पूजन विशेष रांगोळी डिझाईन नक्की आजमावून पहा. या आकर्षक रांगोळ्यांनी तुमच्या अंगणाची शोभा वाढवा आणि दिवाळसण दणक्यात साजरा करा. Lakshmi Pujan 2019 Date & Shubh Muhurat: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 37 वर्षांनी जुळून आलाय 'हा' योग; जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त
अगदी स्वस्तिक पासून ठिपक्यांची रांगोळी, पाना-फुलांची रांगोळी ते संस्कार भारतीच्या रांगोळ्या अशा विविध स्वरूपातील रांगोळ्या साकरल्या जातात. संस्कार भारतीची रांगोळी आकर्षक असली तरीही ती साकारण्यासाठी खास कौशल्य लागतं. पण काही टीप्स आणि ट्रीक्स वापरून तुम्हांला रांगोळी काढण्याची नियमित सवय नसली तरीही ती आकर्षक पणे साकारू शकता. मग पहा आज संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आकर्षक रांगोळी कशी काढाल? Happy Lakshmi Pujan 2019 HD Images: लक्ष्मीपूजनाच्या मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या आपल्या मित्रपरिवाराला तसेच नातेवाईकांना मंगलमयी शुभेच्छा
लक्ष्मी पूजन विशेष रांगोळी
लक्ष्मीच्या रूपातील रांगोळी
लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी
लक्ष्मी पूजा रांगोळी
आज देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. संध्याकाळी लक्ष्मीपूजन, वही पूजन केले जाणार आहे. त्यानंतर उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडवा साजरा केला जाईल तसेच दिवाळी सणाची सांगता भाऊबीज या सणाने केली जाणार आहे.