
Margashirsh Mass 2023 Wishes In Marathi: मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना (Margashirsh Mass 2023) भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. यासोबतच काही खास देवी-देवतांचीही पूजा केली जाते. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे विशेष महत्त्व आहे. 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून 14 डिसेंबरला पहिल्या गुरुवारचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची आणि व्रत ठेवण्याची विशेष परंपरा आहे.
मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व देवी लक्ष्मीच्या पूजेचे आहे. या दिवशी लोक एकमेकांना लक्ष्मी व्रताच्या खास शुभेच्छा देतात. मार्गशीर्ष मासारंभ आणि गुरूवार व्रतानिमित्त तुम्ही WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे आप्तस्वकियांना मंगलमय दिवसाचे शुभेच्छापत्र पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करु शकता. (हेही वाचा -Margashirsha Mahalaxmi Guruvar Vrat 2023 Dates: 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना; पहा महालक्ष्मी व्रत कोणते 4 दिवस!)
मार्गशीर्ष महिना सर्वांना सुख, समृद्धि, आरोग्य व धनसंपदा देणारा जावो हीच सदिच्छा!!

मार्गशीर्ष मासारंभाच्या आणि महालक्ष्मी व्रताच्या पहिल्या गुरूवार च्या शुभेच्छा!
Margashirsh Mass 2023 Wishes (PC - File Image)
मार्गशीर्ष मासारंभाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

मार्गशीर्ष महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा!

माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सहा राहावी,
मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

मार्गशीर्ष महिन्याच्या आणि महालक्ष्मी व्रताच्या पहिल्या गुरूवार च्या शुभेच्छा!

असं म्हटलं जात की, जे कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करते. त्याला आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आयुष्यात सुख, समृद्धी नांदते. धार्मिक मान्यतेनुसार, या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो.