मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरूवारी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत (Margashirsha Mahalaxmi Guruvar Vrat) करण्याची रीत आहे. यंदा 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना आहे. यामध्ये 4 गुरूवारी मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत केले जाणार आहे. 14 डिसेंबरला पहिला गुरूवार असणार आहे तर 4 जानेवारीला शेवटचा गुरूवार आहे. मग या महिनाभराच्या काळामध्ये देवीची उपासना करण्याची रीत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिन्यासारखा हा मार्गशीर्ष महिना देखील अत्यंत पवित्र मानला जात असल्याने अनेकजण या महिन्याभराच्या कालावधीसाठी मांसाहार टाळतात. म्हणूनच जाणून घ्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी आहेत मार्गशीर्ष गुरूवारचे चार दिवस?
मार्गशीर्ष गुरूवारचे 4 दिवस कोणते?
पहिला गुरूवार - 14 डिसेंबर 2023
दुसरा गुरूवार - 21 डिसेंबर 2023
तिसरा गुरूवार - 28 डिसेंबर 2023
चौथा गुरूवार - 4 जानेवारी 2024
मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 12 डिसेंबरच्या रात्री 6.24 वाजता अमावस्या संपल्यानंतर होणार आहे. मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबरला असून या महिन्याची सांगता 11 जानेवारी दिवशी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा महालक्ष्मी व्रतासाठी 4 गुरूवार पाळले जाणार आहेत. Margashirsha Guruvar Vrat 2023 Katha: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी कथा काय? घ्या इथे जाणून .
मार्गशीर्ष गुरूवारी घटाची स्थापना करून तिची महालक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाते. आकर्षक सजावट करून दर गुरूवारी त्याची पूजा केली जाते. त्याला नैवेद्य दाखवला जातो. महालक्ष्मीच्या कहाणीचं पठण केले जाते. शेवटच्या गुरूवारी महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांना वाण देऊन सन्मान केला जातो.