Mahashivratri 2024 Messages (PC - File Image)

Mahashivratri 2024 Messages In Marathi: यंदा महाशिवरात्री (Mahashivratri 2024) 8 मार्च 2024 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात. या दिवशी शिवमंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक जमतात. हिंदू धर्मात महाशिवरात्री (Mahashivratri) हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सण भारताच्या प्रत्येक भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेकजण या दिवशी दिवसभर उपवास करतात. या आनंदाच्या दिवशी अनेक लोक शिवभक्तांना शुभेच्छा संदेश पाठवतात आणि त्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतात.

जर तुम्हालाही महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही मराठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. (वाचा -Mahashivratri 2024 Date: महाशिवरात्र कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून)

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने,

आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने,

पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mahashivratri 2024 Messages (PC - File Image)

शिवाचा महिमा आहे अपरंपार,

भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार,

त्याची कृपा आपल्यावर कायम राहो,

आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…

महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा!

Mahashivratri 2024 Messages (PC - File Image)

शिव आहे सत्य , शिव आहे अनंत

शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे

शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म

शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती

चला शंकराचे करूया नमन

राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

Mahashivratri 2024 Messages (PC - File Image)

भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला,

मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला,

आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश,

प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम,

जय भोले शिव शंकर बाबाची जय.

महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

Mahashivratri 2024 Messages (PC - File Image)

शिव शंकराची भक्ती,

ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,

आपल्या जीवनाची होवो एक नवी आणि चांगली सुरुवात,

हीच शंकराकडे प्रार्थना…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Mahashivratri 2024 Messages (PC - File Image)

महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी सर्वात महत्वाचा पवित्र सण आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री सुरू होते. वरील फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.