Lakshmi Pujan 2024 Messages In Marathi: हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2024) च्या सणाला खूपचं महत्त्व आहे. दिवाळीचा सण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खास असतो. दरवर्षी कार्तिक महिन्यात हा सण मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2024) करण्यात येणार आहे. या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी लक्ष्मी-गणेशाची पूजा केल्याने आनंद आणि शांती मिळते. तसेच संपत्तीत वाढ होते. सनातन परंपरा आणि धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी घरात दिवे लावण्याची प्रथा आहे.
दिवाळीचा सण प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी सर्वत्र दिव्याचा प्रकाश पाहायला मिळतो. घरात, अंगणात दिवे लावले जातात. याशिवाय, लोक एकमेकांना दिवाळी तसेच लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देतात. सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवारास लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास लक्ष्मीपूजन कोट्स, लक्ष्मी पूजा एसएमएस, लक्ष्मीपूजन मराठी संदेश, लक्ष्मीपूजन मराठी स्टेटस घेऊन आलो आहोत.
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!
महालक्ष्मीचे करुनी पूजन,
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृद्धी,
लाभेल तुम्हा जीवनी
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
समृद्धी यावी सोनपावली,
उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मी ही संपत्ती, वैभव आणि समृद्धीची देवी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, योग्य पद्धती आणि विशिष्ट सामग्रीने देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही.