हिंदूधर्मीयांमध्ये आदिशक्तीच्या पूजनाचा सोहळा म्हणजे नवरात्र (Navratri). नऊ रात्री आदिमायेचा जागर केला जातो. यंदा ही नवरात्र 7 ऑक्टोबर पासून पुढील 8 दिवस साजरी केली जाणार आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी देखील नवरात्री सेलिब्रेशन वर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे पूर्ण व्हॅक्सिनेटेट असलात तरीही धोका टळलेला नसल्याने थोड्या खबरदारीनेच हा सण साजरा करण्याचं आवहन करण्यात आलं आहे. घरच्या घरी देखील नवरात्र निमित्त माता की चौकी, कन्या पूजन किंवा जागरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केले असल्यास त्यामध्ये उपस्थितांच्या संख्येमध्ये निर्बंध ठेवा. शक्य असल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या माता की चौकी मध्ये सहभागी करून घेताना व्हीडिओ कॉल, झूम कॉल द्वारा सहभागी करून घ्या. म्हणजे सुरक्षित वातावरणामध्ये हा सोहळा देखील पार पडेल. मग यंदा 'माता की चौकी' जागरण साठी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष भेटीचं आमंत्रण फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) द्वारा पाठ्वण्यासाठी खालील काही मजकुरांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता.
यंदा नवरात्र 7 ऑक्टोबर ते 14ऑक्टोबर असे आठ दिवस रंगणार आहे. तर 15 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. या सणाच्या निमित्ताने तुम्ही प्रियजणांसोबत, नातेवाईकांसोबत आनंद द्विगुणित करताना थोडं आजूबाजूच्या परिस्थितीचं देखील भान ठेवा. Navratri Colours 2021 for 9 Day: शारदीय नवरात्रोत्सवात यंदा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान कराल? पहा संपूर्ण यादी.
नवरात्रीतील 'माता की चौकी' चं आमंत्रण
नमुना 1
माता की चौकी
यंदा नवरात्री दरम्यान आमच्या घरी
महाष्टमी दिवशी 'माता की चौकी' चं
आयोजन करण्यात आलं आहे.
तरी आपण हजेरी लावावी
स्थळ-
तारीख-
वेळ -
नमुना 2
नमुना 3
जय मां अंबे
यंदा नवरात्री उत्सवामध्ये आमच्या येथे दिनांक .... दिवशी माताचं जागरण आयोजित केले आहे. त्यामध्ये ऑनलाईन सहभागी होण्यासाठी आम्ही ही लिंक शेअर करत आहोत. तरी यंदा त्याचा व्हर्च्युअली आनंद घ्यावा, ही विनंती.
आपले नम्र,
लिंक-
वेळ-
नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा काळ असतो. यामध्ये देवीच्या विविध रूपांचा जागर केला जातो. त्यामध्ये भजनं, गाणी म्हटली जातात. गरबा खेळण्याची देखील पद्धत आहे. पण यंदा कोरोनामुळे गरबा खेळण्यावर निर्बंध आहेत. काही ठिकाणी सशर्त गरबा, दांडिया यांचं आयोजन केले जाणार आहे. पण त्यामध्ये सहभागी स्वतः ची आणि आजुबाजूच्या लोकांची देखील काळजी घ्या.