Navratri 2021 Marathi Wishes: आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला आरंभ होतो. त्यानंतर पुढील नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता आश्विन शुद्ध दशमीला दसऱ्या दिवशी होते. या काळात दुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. सार्वजनिक मंडळांमध्ये देवीचे आगमन होते. तर घरोघरी घटस्थापना केली जाते. देवीच्या आगमनाने मंगलमय तर गरबा, दांडीयाने तर उत्साहाचे वातावरण सर्वत्र निर्माण होते. मात्र यंदा देखील कोविड-19 संकटामुळे अनेक नियमांच्या चौकटीत हा उत्सव साजरा करावा लागणार आहे. परंतु, नवरात्री निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, Greetings, GIF's सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) द्वारे शेअर करुन तुम्ही नवरात्रोत्सवाला आनंदाने सुरुवात करु शकता. (Navratri 2021 Messages: नवरात्र आणि घटस्थापनेच्या मंगल प्रसंगी खास मराठी Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा)
नवरात्रोत्सवाच्या विविध कथा सांगितल्या जातात. दुष्ट महिषासुर राक्षसाच्या छळातून सर्व लोकांना मुक्त करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तेजातून एक दिव्य शक्ती निर्माण झाली. वाघावर बसलेल्या अष्टभुजा देवीचे रुप घेऊन तिने महिषासुराशी युद्ध केले आणि दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला. चांगल्याचा वाईटावर विजय मिळवला म्हणूनच 'विजयादशमी' किंवा 'दसऱ्या'चा सण साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर नवरात्रोत्सव वेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा केला जातो. (Ghatasthapana 2021 Puja Vidhi: घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ वेळ)
नवरात्री शुभेच्छा संदेश:
नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला
शुभ नवरात्री!
विश्व जिला शरण आले
त्या शक्तीला शरण जाऊया…
नवरात्रीच्या मंगल दिनी
भवानीचे स्मरण करू या
नवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा!
नव कल्पना
नव ज्योत्स्ना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्रीच्या या पावन पर्वावर
पूर्ण होवोत आपल्या सार्या मनोकामना
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
न- नवचेतना देणारी
व- विघ्नांचा नाश करणारी
रा- राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची
बरसात करो...
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
GIF's
नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अनेक धार्मिक कार्यक्रम, विधींचे आयोजन केले जाते. गरबा, दांडीया याची धूम असते. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड देखील सेट झाला आहे. यालाही सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही यंदाच्या नवरात्रोत्सवाचा भरभरुन आनंद घ्या. तुम्हाला सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!