
डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत, वातावरणात आनंद, चैतन्य, उत्साह भरणारा वर्षातील शेवटचा मोठा सण ख्रिसमस (Christmas 2020) म्हणजेच नाताळ साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताचा (Jesus Christ) जन्मदिन म्हणून जगभरातील ख्रिस्ती बांधव 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करतात. ख्रिसमस ट्री, रोषणाईने सजवलेली घरे, विविध मिठाया, केक, रात्रीचा मास, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद, गीते, डान्स, संगीत अशा प्रकारे ख्रिसमसचे सेलिब्रेशन होते. ख्रिस्ती बांधवांच्या जीवनात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. ख्रिश्चन समाजातील लोक येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानतात आणि या धर्माच्या लोकांसाठी हा सर्वात मोठा सण मानला जातो. आता तर फक्त ख्रिश्चनच नाही तर इतर धर्मातील लोकही हा सण साजरा करतात.
तर येशूच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून तुम्ही ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ शकता.
आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमीच बरसू दे
नाताळच्या खूप खूप शुभेच्छा!

वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
प्रार्थना आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
ख्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा!

ख्रिसमस ट्रीने सजले अंगण, प्रभूच्या कृपेने भरून आले मन
दिव्यांची रोषणाई झळाळली दारी, आली, नाताळची पवित्र रात्र आली
ख्रिसमसच्या सर्वांना शुभेच्छा!

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो,
आपल्या जीवनात प्रेम, सुख-समृध्दी येवो
मेरी ख्रिसमस! नाताळच्या शुभेच्छा!

मदर मेरीच्या पोटी, जन्मला येशू बाळ
आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!

दरम्यान, पहिला रोमन सम्राट याच्या सत्ताकाळात इसवी सन 336 मध्ये पहिला ख्रिसमस साजरा करण्यात आल्याची नोंद आहे. हा दिवस होता 25 डिसेंबर. त्यानंतर काही वर्षांनी पोप ज्युलीयस याने 25 डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करावा असे जाहीर केले. नाताळ सणामध्ये 'ख्रिसमस ट्री'ला अत्यंत महत्त्व असते. या दिवशी सूचिपर्णी झाडावर आकर्षक रोषणाई करून ते सजवले जाते. कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किवा गायीचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसिकर याने 1223 साली सुरू केली.
(हेही वाचा: नाताळ सणासाठी 'क्रिसमस ट्री' ला का आहे विशेष महत्व; जाणून घ्या यामागचे मूळ कारण)
संपूर्ण जग 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करते, मात्र सर्बिया, बेलारूस, मॉन्टेनेग्रो, कझाकस्तान, मॅसेडोनिया, इथिओपिया, ज्योर्जिया इत्यादी देशांमध्ये 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो.